Video: चालत्या गाडीवर बसून ‘त्यानं’ मारली म्हशीला लाथ आणि झालं असं…

Video: चालत्या गाडीवर बसून ‘त्यानं’ मारली म्हशीला लाथ आणि झालं असं…

प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, तुम्ही सिंह, साप आणि हत्ती यांच्या अनेक लढाया पाहिल्या असतील. जंगलात उंदीर, मांजर आणि सिंह यांचे दुर्मिळ व्हिडीओ देखील पाहिले असतील.

मात्र यावेळी, असा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका व्यक्ती म्हशीला लाथ मारण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला त्याची शिक्षा मिळाल्याचे या व्हिडीओमध्ये बघायला मिळतेय. यावरून असे लक्षात येते की, जसे कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ मिळतेच. हा व्हिडीओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

असा आहे व्हायरल होणारा व्हिडीओ

एका गाडीवर दोन व्यक्ती जात असताना मागे बसणारा व्यक्ती रस्त्याने जाणाऱ्या मशीला लाथ मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा तोल जाऊन दोघेही गाडीवरून खाली पडतात. हा साधारण ५ मिनिटांचा व्हिडीओ असून चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करताना सुशांत नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले की, Karma has no menu. It serves you what you deserve… जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळतेच..याचे उत्तम उदाहरण या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे.

सुशांत नंदा यांनी २५ मे रोजी हा व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओ आतापर्यंत ४७ हजारांहून त्याला ५ हजाराहून जास्त लाईक्स आणि हजारांहून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहे.


… म्हणून ‘या’ वृत्तपत्राने पहिल्या पानावर छापली कोरोनाने बळी घेतलेल्या रूग्णांची नावं!
First Published on: May 26, 2020 2:18 PM
Exit mobile version