चक्क स्टेडियमध्ये केले प्रपोज!

चक्क स्टेडियमध्ये केले प्रपोज!

प्रातिनिधिक फोटो

आजकालचे तरुण वेगवेगळ्या पद्धतीने स्वत:चे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. आपण व्यक्त केलेले प्रेमाचे क्षण आयुष्यभर लक्षात रहावे यासाठी प्रेमपत्र जपून ठेवले जाते किंवा कवितेतून प्रेम व्यक्त केले जाते. मात्र, लंडनमध्ये एका तरुणाने अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीने आपले प्रेम व्यक्त केले आहे. त्याने चक्क क्रिकेटच्या सामन्यादरम्यान एका मुलीला प्रपोज केले आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असणाऱ्या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये प्रेम फुलताना दिसले. इंग्लंडने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात इंग्लंडने भारताला ३२३ रन्सचे लक्ष्य दिले आहेत. तर, दुसरीकडे लॉर्ड्स स्टेडिअममध्ये प्रेमाचा गुलाल उधळला जाताना दिसत आहे. त्यामुळे सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांची नजर काही वेळेसाठी मॅचपेक्षा या घटनेकडे जास्त होते.

नक्की काय घडले?

सामना दरम्यान एका तरुणाने एका मुलीला प्रपोज केले आणि गुडघ्यावर बसत त्या मुलीच्या बोटांमध्ये अंगठी घातली. मुलीनेही लगेच त्याच्या या प्रपोजला होकार दिला. या घटनेवर स्टेडिअममध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवित आनंद व्यक्त केला. गमतीची गोष्ट म्हणजे या घटनेवर भारतीय बॉलर यझुवेंद्र सिंहनेसुद्धा टाळ्या वाजवल्या. या संबंधित व्हिडिओ एका दर्शकाने ट्विट केला आहे.

याअगोदरही असे क्षण कॅमेऱ्यात कैद

या अगोदरही क्रिकेटच्या स्टेडिअममध्ये अशा घटना कैद झाल्याचे समोर आले आहेत. परंतु, त्यावेळी असे क्षण साजरा करणारे दुसरे कुणी नसून भारताचे कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा होते. गेल्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक केले तेव्हा अनुष्काने त्याला फ्लाइंग किस केली होती. हे पाहताना स्टेडिअममधल्या प्रेक्षकांचे डोळे विस्फारुन गेले होते. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

First Published on: July 14, 2018 8:34 PM
Exit mobile version