सोने आणि पैशांची केली शेकोटी, माथेफिरूचा अजब कारनामा

सोने आणि पैशांची केली शेकोटी, माथेफिरूचा अजब कारनामा

सोने आणि पैशांची केली शेकोटी, माथेफिरूचा अजब कारनामा

कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अनेक जण नवनवीन उपाय करत असतात. मात्र उत्तप्रदेशातील महोबा जिल्ह्यातील एका माथेफिरूने थंडीपासून वाचण्यासाठी असा काही कारनामा केली की सारेच अवाक झाले. महोबा शहरातील कोतवाली येथील जुन्या भाजी मंडई परिसरात या माथेफिरुने थंडीपासून वाचण्यासाठी चक्क ५००- ५०० च्या नोटांनाच आग लावून टाकली. बुंदेलखंडसारखा परिसर विक्षिप्त, गरीब नागरिकांचा अड्डा बनत आहे. त्यामुळे यापरिसरात अशाप्रकारे ५०० च्या नोटा जाळल्याची घटना घडल्याने सारेच चकीत झाले.

या परिसरात सफाई काम करणाऱ्या कामगारांचे म्हणणे आहे की, या माथेफिरुला येथील कचऱ्याच्या ठिगाऱ्यात लाखो रुपयांच्या नोटा, २ स्मार्टफोनसह सोन्या, चांदीचे दागिने आणि धारधार हत्यार सापडले. परंतु त्याने हे सर्व साहित्य आगीत जाळून टाकले. माथेफिरूने कचऱ्यात सापडलेल्या हा लाखोंचा ऐवज आगीत टाकाला आणि जोरजोरात हसू लागला. आणि लोकांनी विचारल्यावर सांगू लागला की, काय करु? मला थंडी तर खूप वाजत होती. म्हणून हातात आले ते जाळून थंडीपासून बचाव केला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि याचा अधिक तपास केला जात आहे. पोलिस याघटनेची कसून चौकशी करत आहेत. परंतु परिसरातील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की, या माथेफिरुकडे एवढ्या मोठ्याप्रमाणात पैसे, दागिने, हत्यार हे साहित्य आले कुठून? या अवाक करणाऱ्या घटनेवर पोलिसही काही बोलण्यास तयार नाहीत.


हेही वाचा- गर्लफ्रेंडने ९ महिने केलं प्रेग्नंट असल्याचे नाटक, बॉयफ्रेंडची कोर्टात धाव


 

First Published on: February 9, 2021 5:44 PM
Exit mobile version