LockDown: WhatsAppवर फ्री बिअरचे मेसेज येत असेल तर सावधान!

LockDown: WhatsAppवर फ्री बिअरचे मेसेज येत असेल तर सावधान!

Wine : किरणा दुकान अन् सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अनेक प्रकारचे फेक मेसेज येत आहेत. सध्या अशाच प्रकारचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. लॉकडाऊनमध्ये हेनेकेन ब्रँडतर्फे मोफत बिअर दिल्या जात असल्याचा दावा केला आहे. कंपनीकडून दिलेल्या सर्वेक्षण भरण्याऐवजी चार बिअर मोफत देण्यात येत आहेत, असे या मेसेजमधून व्हायरल होत आहे.

मात्र हेनेकेन ब्रँडने हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. या मेसेजमध्ये काहीही तथ्य नाही आहे. कंपनीकडून अशा कोणत्याही प्रकारची ऑफर दिली जात नसल्याचे हेनेकेन स्पष्ट केले आहे. अशा फेक मेसेजमुळे माहिती चोरण्याचे प्रकार घडत आहेत. लोक त्या मेसेजमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करतात आणि यामुळे डेटा चोरला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हा मेसेज एका ट्विटर युजरने कंपनीबरोबर शेअर केला होता. त्यावेळेस कंपनीने हे फेक असल्याचे स्पष्ट केले. आताच्या परिस्थितीत असे अनेक मेसेज येतात पण त्याच्या विश्वास ठेऊ नका आणि मेसेजमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक देखील करू नका. या लिंकवर क्लिक केल्यामुळे डिव्हाइस हॅक होण्याची शक्यता असते.

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी केला आहे. अशा परिस्थितीत लोकांना फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीच घरा बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे फेक मेसेज व्हायरल होत आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: बोटांना सूज किंवा जळजळ होणे कोरोनाची नवीन लक्षणे!


 

First Published on: April 24, 2020 4:45 PM
Exit mobile version