सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट

सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट

सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्यांसाठी तयार केलेल्या योजनांमुळे किंवा त्यांच्या वक्तव्याने ते नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे राजकीय व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची लोकप्रियता जनमाणसांत आहे. मात्र भारतीय आणि अमेरिकन एजन्सीच्या एका सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत कोरोना महामारी दरम्यान घट झाली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर २०१९ मध्ये मोदी पुन्हा बहुमताने निवडून आले. २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाने ५४२ पैकी ३०३ जागा जिंकून सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या होत्या आणि एकून ३७ टक्के जनतेची मते त्यांनी मिळविली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने १९.५ टक्के मताधिक्याने केवळ ५२ जागा जिंकल्या होत्या.

करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भारतीय एजन्सी CVoter च्या मते, केवळ ३७ टक्के लोकांनी मोदींच्या कामगिरीवर  समाधानी असल्याचे म्हटले आहे. याबरोबरीने Reuters च्या म्हणण्यानुसार, करण्यात आलेल्या सर्वेक्षणांतर्गत २०२० मध्ये ६५ टक्क्यांनी मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली, कारण ते मोदींच्या कामगिरीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय पंतप्रधानांची एकूण लोकप्रियता ६३ टक्के इतकी होती, त्यापैकी मोदींना नापसंत करणाऱ्यांची संख्या ३१ टक्के असल्याची माहिती युनायटेड स्टेट्स-आधारित एका सर्वेक्षण एजन्सीने दिली. जी एजन्सी जगातील अनेक नेत्यांवर लक्ष ठेवून असते.

दरम्यान, एप्रिलमध्ये पंतप्रधानांच्या लोकप्रियतेच्या रेटिंगमधील सर्वात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकन एजन्सीने ऑगस्ट २०१९ मध्ये मोदींच्या लोकप्रियतेचा मागोवा घेतला त्यांनी सध्या असलेली मोदींची लोकप्रियता ही २२ अंकांनी घसरल्याचीही माहिती दिली आहे. म्हणूनच, दोन सर्वेक्षणातील आकडेवारीच्या आधारे, मोदी सरकारच्या कारभारावर नाराजी दर्शविणाऱ्या आणि त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्या त्यातील समाधानी लोकांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे.

 

First Published on: May 20, 2021 2:29 PM
Exit mobile version