Video : कुत्रा-माकड्यांच्या गॅंगवॉरमध्येच एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Video : कुत्रा-माकड्यांच्या गॅंगवॉरमध्येच एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Video : कुत्रा माकड्याच्या गॅंगवारमध्ये दोघांचा एक ह्रदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

सध्या महाराष्ट्रातील माकड आणि कुत्रा यांच्यातील गँगवॉर जगासाठी चर्चेचा विषय ठरलाय. बीड जिल्ह्यातील माकडांच्या एका टोळीने १ महिन्यात तब्बल २०० ते २५० कुत्र्यांचा जीव घेतला. त्यामुळे माकड आणि कुत्रा यांच्यातील शत्रूत्व आता जगजाहीर झालेय. या घटनेदरम्यान सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ज्यातून कुत्रा आणि माकडाच्या नात्यातील अनोख्या बाजूचे दर्शन घडवले आहे. एकीकडे माकडांकडून कुत्र्यांचा जीव घेतला जातोय तर दुसरीकडे मात्र एक माकड कुत्र्याच्या पिल्लाची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतोय. हे माकड त्या कुत्र्याच्या पिल्लासोबतचं राहतं त्याच्यासोबतचं जेवतं. ही घटना छत्तीसगडमधील असल्याचे बोलले जातेय.

सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ देखील महाराष्ट्रातील असल्याचे बोलले जातेय. यात एक माकड कुत्र्याच्या पिल्लाला वाचवताना दिसतयं. विरल भयानी नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात कॅप्शनमध्ये लिहिले की, माकडाने कुत्र्याच्या पिल्लाला वाचवले का? आम्हीपण तुमच्यासारखे जिज्ञासू आहेत. हा व्हिडिओ जवळपास ८ लाखहून अधिक वेळा पाहायला गेलाय. तर ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केलाय.

आयएफएस अधिकारी सुसांत नंदाने यांनीही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करत या घटनेतील सत्य बाजू सांगितली आहे. त्यांनी लिहिले की, छत्तीसगडमधील हे माकडं गेल्या ४ दिवसांपासून कुत्र्याच्या पिल्लासोबत अगदी गुण्यागोविंदाने राहतयं. पण आपण महाराष्ट्रातील बीडमधील कुत्रा माकडाच्या गँगवॉरवर विश्वास ठेवतोय. जेथे माकडाने कुत्र्याचा बदला घेण्यासाठी २५० कुत्र्यांची हत्या केली. सुसांत नंदा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ आत्तापर्यंत १६ हजारहून अधिक यूजर्सनी पाहायलाय. तर १५०० हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलाय. तर अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्यात.


रोहिणी कोर्ट गोळीबार प्रकरण: वकील दिसण्यासाठी आरोपींना दिलं होतं ट्रेनिंग


 

First Published on: December 22, 2021 5:00 PM
Exit mobile version