Video: माकडाला कळलं, पण माणसाला कधी कळणार?

Video: माकडाला कळलं, पण माणसाला कधी कळणार?

Video: माकडाला कळलं, पण माणसाला कधी कळणार?

माणूसही प्राण्यांप्रमाणे का विचार करू शकत नाही? असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहे. याचं कारण ही तसंच आहे. सोशल मीडियावर एक माकडाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. हा १४ सेकंदाचा व्हायरल व्हिडिओ निहारिका सिंग पांजलेने टि्वटरवर अकाऊंटवरून खूप महत्त्वपूर्ण कॅप्शन देऊन शेअर केला आहे. हा व्हिडिओ माणसाला खूप शिकवण्यासारखा आहे. या व्हिडिओ मध्ये एका माकडाने पाईप मधून वाया जाणारे पाणी पाहून ते माकड सुकलेल्या पानाने ते पाणी वाचवतं आहे.

निहारिका सिंग पांजलेने हे टि्वट करताना असं लिहिलं आहे की, ‘जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना जर एवढी बुद्धीमत्ता, संवेदनशीलता असेल तर मग मला असा प्रश्न पडतो की, मानव असं का वागतो? आणि खरे प्राणी कोण आहेत? असा प्रश्न तिने टि्वटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. पहा हा व्हिडिओ….

नक्की पहा – Video : चक्क माकड काढतंय पोलिसाच्या डोक्यातल्या उवा!

या व्हिडिओला ३ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून ५०० लाईक्स मिळाले आहेत. तसंच हा व्हिडिओ टि्वटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. टि्वटर युझरने या व्हिडिओवर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने असं म्हटलं आहे की, ‘मनुष्य हा पृथ्वीवरील असा तत्त्वहीन माणूस आहे, ज्याची जीवनशैली अनैसर्गिक आहे.’ पहा नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया…


हेही वाचा Video : अँकरच्या मुलाने लाईव्हमध्ये घातला धुमाकूळ


 

First Published on: October 11, 2019 8:56 PM
Exit mobile version