मोनालिसा देतेय Safe Driving धडे; मुंबई पोलिसांची भन्नाट आयडिया!

मोनालिसा देतेय Safe Driving धडे; मुंबई पोलिसांची भन्नाट आयडिया!

सोशल मीडियातील ट्विटरवर सर्वाधिक कोण अॅक्टिव्ह असेल तर ते म्हणजे मुंबई पोलीस. मुंबई पोलीस नेमही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच चर्चा होत असते. तर मुंबई पोलीस सोशल मीडियाद्वारे नेहमीच मुंबईकरांसह नागरिकांची जनजागृती करत असतात. मुंबई पोलिसांच्या अनोख्या ट्वीटमुळे त्यांची नेहमी सोशल मीडियावर चर्चा होत. एव्हढंच नाही तर सोशल मीडियावरील ट्रेंड आणि मिम्स ट्रेडिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना जागरूक करत असतात.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी नागरिकांनी सीट बेल्टचे महत्व पटवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट सध्या चर्चेत असून जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांच्या आयडियाच्या कल्पनेचे नेटकऱ्यांकडून तुफान कौतुक केले जात आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी नागरिकांना सीट बेल्टचे महत्त्व पटवून देताना चक्क कारमध्ये बसलेल्या मोनालिसाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मोनालिसाने सीट बेल्ट लावल्याचे दिसतेय. या फोटोला कॅप्शन देताना मुंबई पोलिसांनी असे लिहिले की, ‘द विंची कोड ऑफ सेफ्टी. सुरक्षेचा कोड शोधून काढणे तेवढे कठीण नाही- फक्त वाहन चालवताना सीट बेल्ट लावा!’ मुंबई पोलिसांच्या या भन्नाट क्रिएटिव्हिला नेटकऱ्यांनी चांगलेच डोक्यावर घेत त्यांच्या पोस्टवर लाईक्सचा धडाका लावला आहे.

दरम्यान, डिजिटलायझेनच्या युगात जुळवून घेताना, सोशल मीडियाचा मुंबई पोलिसांनी पुरेपूर वापर केला. या सकारात्मक वापराला ५ वर्ष पूर्ण झाली असून मुंबईकरांना ही माहिती देण्यासाठी देखील मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलचाच वापर केला.


मुंबई पोलीस म्हणाले, ‘५ वर्षांपूर्वी झाली होती आपली भेट’
First Published on: January 14, 2021 3:12 PM
Exit mobile version