राज्यपालांच्या बैठकांचे लाईव्ह टेलिकास्ट करा; ट्विटरवर अजब मागणी

राज्यपालांच्या बैठकांचे लाईव्ह टेलिकास्ट करा; ट्विटरवर अजब मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती राज्यपालांची भेट

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतिसिंह कोश्यारी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट आणि सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्यानंतर कधी नव्हे ते राज्यपालांवर देखील सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत आहेत. राज्यपाल पद हे घटनात्मक पद असून त्याची एक प्रतिष्ठा आहे. मात्र नेटीझन्सवरील तरुण आपली रोखठोक मते न घाबरता व्यक्त करतात. सध्या असेच एक मत एका नेटीझन्सने व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून अनेक पक्षांचे लोक राज्यपालांची भेट घेत आहेत. या बैठकांचे लाईव्ह टेलिकास्ट राज्यपालांनी करावे, म्हणजे जनतेला हे पक्ष कशाप्रकारे चर्चा करतात हे कळू शकेल, असे ट्विट एका तरुणाने केले आहे.

९ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपल्यापासून अनेक पक्षांनी राज्यपालांची भेट घेतली. मात्र एकाही बैठकीत सत्ता स्थापनेबाबत तोडगा निघालेला नाही. त्यावर काही मिम्स आले आहेत. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याबद्दल नुकसान भरपाई द्यावी, यासाठी अनेकजण राज्यपालांना जाऊन भेटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली. तर उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटायला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडलेला असताना राज्यात मात्र सरकारच अस्तित्वात नाही. सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी राजकीय पक्षांच्या राजभवनात फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र या फेऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची झालर लावली जात आहे की खरंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होते? असा प्रश्न काहींना पडला आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेक तरुण आपला रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

 

शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली होती राज्यपालांची भेट

 

First Published on: November 15, 2019 3:50 PM
Exit mobile version