सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांनी सीजन २ साठी सुरू केली मोहीम

सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांनी सीजन २ साठी सुरू केली मोहीम

सेक्रेड गेम्स सीजन २ साठी आंदोलन करणाऱ्या मुलांचा इंटरनेटवर व्हायरल झालेला फोटो

नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सेक्रेड गेम्स या वेब सिरीजने नेटीझन्सना अक्षरश: वेड लावले होते. ही सिरीज लोकांच्या पसंतीस उतरली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकली. परंतु या सिरीजमधील नवाजुद्दीनच्या पात्राने सर्वांची मने जिंकली आहेत. सिरीजच्या पहिल्या सीजनमध्ये तो खलनायकाच्या रुपात पहायला मिळाता तरी लोकांना त्याचा रोल जबरदस्त आवडला आहे. सिरीजवर, त्यामधील डायलॉग्जवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत. या सिरीजमधील डायलॉग रेल्वेमध्ये, कॉलेजच्या कट्ट्यावंर, बस स्टॉपवर लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. सिरीजचा पहिला सीजन संपला आहे. सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांना आता दुसऱ्या सीजनची उत्तुकता लागली आहे. त्यासाठी नेटीझन्सनी ट्विटरवर मोहीम सुरू केली आहे. #WeWantSacredGames2 हा हॅशटॅग वापरून नेटीझन्सनी दुसऱ्या सीजनची मागणी केली आहे. नेटीझन्सनी सिरीजच्या निर्माते अनुराग कश्यप यांना ट्विटरवर टॅग करुन व्ही वॉन्ट सेक्रेड गेम्स २ अशी मागणी केली आहे.

 

का आहे इतकी उत्सुकता?

या सिरीजमध्ये गणेश गायतोंडेची (नवाजुद्दीन सिद्दिकी) कथा दाखवण्यात आली आहे. सिरीजमध्ये गायतोंडेने सरताज सिंग (सैफ अली खान) ला मुंबई शहर वाचवण्यासाठी २५ दिवसांची मूदत दिली होती. सिरीजचा पहिला सीजन संपला असून गायतोंडेने दिलेल्या २५ दिवसांपैकी आता केवळ १० दिवस उरले आहेत. शहर अद्याप मोठ्या संकटात आहे. त्यातच पहिसा सीजन संपला. पहिल्या सीजनचा उत्कंठावर्धक असा शेवट झाला होता. त्यामुळे लोकांची पुढच्या सीझनसाठीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

 

कौन है त्रिवेदी?

बाहुबली या गाजलेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर देशभरातील लोकांना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली होती. ‘कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी लोकांनी जंग जंग पछाडले होते. अगदी तशीच अवस्था सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांची झाली आहे. या सिरीजची गोष्ट ‘त्रिवेदी’ या पात्राभोवती फिरते, परंतु पहिल्या सीजनमध्ये त्रिवेदीचा चेहरा दाखवण्यात आला नाही. त्यामुळे कोण आहे त्रिवेदी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

 


 

 

 

 

First Published on: July 26, 2018 7:24 PM
Exit mobile version