GoodNews! नव्या वर्षात जॉबचं No Tension; ‘या’ कंपन्यांमध्ये होणार मेगा भरती

GoodNews! नव्या वर्षात जॉबचं No Tension; ‘या’ कंपन्यांमध्ये होणार मेगा भरती

प्रातिनिधीक फोटो

गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि कित्येक जण बेरोजगार झालेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना काही कंपन्यांची आर्थिक गणितं बिघडल्याने कर्मचारी कपात देखील करण्यात आली होती. मात्र नव्या वर्षात दिलासादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे एका सर्वेक्षणानुसार, ५३ टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे की, ते २०२१ मध्ये त्यांच्या कंपनीमध्ये बेरोजगार असलेल्यांना नोकरीची संधी देऊन कर्मचारी संख्या वाढवण्याच्या तयारीत आहेत. भारतातील ७४ टक्क्यांहून अधिक टेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची संख्या १४ टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा विचार करीत आहेत. व्यावसायिक सेवा प्रदान करणारी मायकेल पेज इंडियाच्या टॅलेंट ट्रेंड २०२१ चा अहवाल नुकताच सादर झाला असून त्यात असे म्हटले की, भारतातील कमीतकमी ५३ टक्के कंपन्या २०२१ मध्ये नवीन भरती करणार आहेत.

या अहवालानुसार, असे सांगितले जात आहे की, कोरोना महामारीदरम्यान नोकर भरती संबंधित कामांमध्ये १८ टक्के घट झाली आहे. मायकेल पेज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निकोलस डुमौलिनच्या मते, तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय घडामोडी घडल्या आहेत. या व्यतिरिक्त ई-कॉमर्स आणि एज्युकेशन टेक्नॉलॉजी सारख्या आयटी क्षेत्रातही मेगा भरती निघणार असून ही मागणी कायम राहण्याची अपेक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चार मोठ्या आयटी कंपन्या CS, Infosys, HCL आणिWipro यांनी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत ३६ हजार ४८७ कर्मचारी भरती केले आहेत. मागील वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत या चार कंपन्यांनी मिळून फक्त १० हजार ८२० कर्मचार्‍यांना नोकरी दिली. त्यानुसार, तिसऱ्या तिमाहीत २४० टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील आर्थिक वर्षात (२०२१-२०२२) या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी भरती सुरू राहणार आहे. या अहवालानुसार या चार कंपन्या पुढील आर्थिक वर्षात साधारण ९१ हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार असल्याचे सांगितले जात आहे.

First Published on: January 27, 2021 6:30 PM
Exit mobile version