Vaccination: लस नाही तर Dating पण नाही! तरुणाईचा नवीन ट्रेंड

Vaccination: लस नाही तर Dating पण नाही! तरुणाईचा नवीन ट्रेंड

Vaccination: लस नाही तर Dating पण नाही! तरुणाईचा नवीन ट्रेंड

सध्या देशभरात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. देशात लसीचा तुटवडा आहे मात्र आता तोही लवकरच दूर होणार आहे. लसीकरणच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील १८ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनामुळे संपूर्ण देश बदला. मग देशातील तरुणाई नाही बदलणार का? कोरोना लसीविषयी तरुणाईही जागृत असल्याचे समोर आलेय. तरुण मंडळींमध्ये डेटिंग हा प्रकार खूप खास असतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असे समोर आले आहे की, तरुणाई त्याच व्यक्तीसोबत डेटिंग करणार आहे ज्यांनी कोरोना लस घेतली आहे. ऑनलाइन डेटिंग वेबसाइट असलेल्या क्वेकक्वेकने एक सर्वेक्षण केले आहे. त्यात असे समोर आले लसीकरण न केलेल्या पार्टनसोबत डेटिंगसाठी नकार दिला जात आहे. यातून एकप्रकारे देशातील तरुणाई लसीकरणाला महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे.

१८ ते ३० वयोगटातील लोक लस घेतल्यानंतर डेडिंग करु इच्छितात. ३१ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयातील ८ ते १० टक्के लोकांनी त्यांच्या नात्यात लस घेण्याचे चॅलेन्ज लावले आहे. त्याचप्रमाणे १८ ते ३० वयोगटातील ३० टक्के लसी न घेता कोरोनाचे सर्व नियम पाळून, योग्य सुरक्षा बाळगून डेटिंग करण्याचा विचार करत आहेत. ८० टक्के महिला आणि ७० टक्के पुरुषांचे असे म्हणणे आहे की, लस घेतलेल्या व्यक्तीसोबत डेडिंगला जाणे योग्य आहे.

क्वेकक्वेक संस्थेचे संस्थापक आणि सीईओ रवि मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, या सर्वेमध्ये त्यांच्या असे लक्षात आले की, लोक कोरोनाच्या संकटात बेजबाबदारपणाने वागत नाहीत. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. तरुणीई देशासाठी चांगला विचार करत आहे. कोरोनाच्या सर्व प्रोटोकॉलचे योग्य पालन करत आहेत, असे ते म्हणाले.

या सर्वेमधून एक गोष्ट लक्षात आली आहे की, एखाद्या व्यक्तीसोबत डेटिंगला जाण्यासाठी चांगले कपडे,विचार जुळणे,फिरण्यासाठी चांगली जागा निवडणे यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या मात्र आता डेटिंगला जाण्यासाठी लसीकरण करणे ही एक महत्त्वाची बाब ठरली आहे. लस नाही तर डेटिंगपण नाही हा तरुणाईचा नवा फंडा समोर आला आहे.


हेही वाचा – ‘या’ देशात झाला ‘उंदरांचा पाऊस’, व्हिडिओ झाले व्हायरल

 

 

First Published on: May 14, 2021 3:57 PM
Exit mobile version