खासदार नुसरत जहांचा ‘दुर्गा पुजे’चा डान्स व्हीडीओ व्हायरल

खासदार नुसरत जहांचा ‘दुर्गा पुजे’चा डान्स व्हीडीओ व्हायरल

खासदार नुसरत जहांचा 'दुर्गा पुजे'चा डान्स व्हिडीओ व्हायरल

गणेशोत्सव झाल्यानंतर वेध लागतात ते म्हणजे नवरात्रीचे. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव अधिक जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

कोणाचा आहे हा व्हिडिओ

खासदार नुसरत जहां आणि मीमी चक्रवर्ती यांचा दुर्गा पुजेचा एक डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पुजेला सर्वात जास्त महत्त्व आहे. ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पुजेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती या दोघी दुर्गा मातेच्या गाण्यात डान्स करत आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत ९.६ लाख लोकांनी व्हिडीओ पाहिला असून फेसबुकवर १.५ मिलीयन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती या दोघीही खासदार असून नुसरत बशीरहाट आणि मिमी या जादवपूरच्या खासदार आहेत. हा व्हिडीओ लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या एका कंपनीने बनवला आहे. व्हिडिओमध्ये बंगाली चित्रपट अभिनेत्री सुभाश्री गांगुली देखील आहे. ‘आशेय माँ दुर्गा शे’ असे या गाण्याचे बोल आहेत.


हेही पहा – ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी


First Published on: September 21, 2019 8:54 PM
Exit mobile version