ऑनलाईन भिक मागून महिलेनं कमावले १७ दिवसात तब्बल ३५ लाख !

ऑनलाईन भिक मागून महिलेनं कमावले १७ दिवसात तब्बल ३५ लाख !

(प्रातिनिधिक फोटो)

संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) एका महिलेनं लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी तिला अटकं करण्यात आली आहे. घटस्फोट पीडित असल्याचं सांगून तिने केवळ १७ दिवसात तब्बल ३५ लाख जमा केले. तिचा घटस्फोट झाला असून मुलांचा संभाळ करायला तिच्याजवळ पैसे नाहीत, अशी तिनं सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर अनेकांनी तिला पैसे द्यायला सुरुवात केली. परंतु ही माहिती साफ खोटी असल्याचे तिच्या पतीने पोलिसांना सांगितल्यावर तिला अटक करण्यात आली.

या महिलेनं तिच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या अकाउंटवरुन एक पोस्ट केली. महिलेने यात सांगितलं की, तिचा पती तिला सोडून गेला आहे. मुलांचा संभाळ करायला तिच्याजवळ पैसे नाहीत. एवढेच नव्हे तर, तिने तिच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले होते. या महिलेच्या पतीला आपली पत्नी अशाप्रकारे पैसे गोळा करत असल्याची कल्पना नव्हती. नातेवाईकांनी सोशल मीडियावर फोटो बघितल्यानंतर तिच्या पतिला कळवलं. त्यानंतर तिच्या पतीने पोलिसांना सांगितले की, त्यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र त्यांच्या मुलांचा संभाळ तो स्वत: करत आहे. त्याच्या पत्नीने लोकांची फसवूक केली आहे, असे या महिलेचा पती म्हणाला. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. सत्य समोर येताचं पोलिसांनी तिला अटक केलं. धक्कादायक प्रकार म्हणजे या महिलेनं केवळ १७ दिवसात ३५ लाख रुपये जमा केलं. या महिलेचं नाव आणि इतर माहिती गुपीत ठेवण्यात आली आहे.

First Published on: June 11, 2019 2:55 PM
Exit mobile version