TikTok स्टारच्या बायकोने फॉलोअर्स वाढवण्यासाठी जिवंत नवऱ्याला मारले!

TikTok स्टारच्या बायकोने फॉलोअर्स वाढवण्यासाठी जिवंत नवऱ्याला मारले!

TikTok स्टारच्या बायकोने फॉलोअर्स वाढवण्यासाठी जिवंत नवऱ्याला मारले!

भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर त्याची क्रेझ पण संपली आहे. पण पाकिस्तानमध्ये या चीन Appने धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानातील लोक टिकटॉकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ता अवलंबत आहेत. असेच काहीस एका जोडप्याने केले आहे. पण त्यांना असे करणे महागात पडले आहे. दरम्यान एका महिलेने टिकटॉकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा फेक व्हिडिओ तयार करून तो टिकटॉकवर अपलोड केला. या व्हिडिओमुळे महिलेचे फॉलोअर्स वाढत नसून तिच्या घरी सांत्वन करण्यासाठी लोक पोहोचले.

पतीचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओमुळे अनेक लोक महिलेला थेट भेटण्यासाठी तिच्या घरी गेले आणि त्यानंतर सत्य समोर आले. आदिल राजपूत असे या टिकटॉक स्टारचे नाव आहे. हा टिकटॉक स्टार आपल्या पत्नीसोबत व्हिडिओ बनवत असतो. पाकिस्तानी माध्यमांनी या दोघांची नावे सलीम राजपूत आणि फराह राजपूत असे ठेवले आहे. टिकटॉकवर आदिलचे २६ लाख फॉलोअर्स आहेत. स्थानिक मीडिया चॅनल जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, आदिलच्या मृत्यूची बातमी समजातास मंगळवारी त्याचे चाहते हैराण झाले.

वास्तविक, आदिल राजपूतच्या टिकटॉक अकाऊंटवरून पत्नीने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये पत्नी आदिल याचे निधन झाल्याची माहिती देत होती. यानंतर आदिलचे चाहते आणि त्याचे नातेवाईक त्याच्या घरी पोहोचले. काही मशिदीतून सुद्धा आदिलच्या मृत्यूची बातमी जाहीर करण्यात आली होती. नातेवाईक आणि चाहते घरी पोहोचल्यानंतर सत्य समोर आले. आता लोकं आदिलची पत्नी फराह हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान भारतानंतर पाकिस्तानातही टिकटॉकला बंदी घालण्याची मागणी होत आहे. टिकटॉकवर अश्लील गोष्टी पसरवल्याचा आरोप आहे.


हेही वाचा – धक्कादायक! बलात्काराला विरोध केल्याने ७ वर्षांच्या चिमुकलीची काकाने केली हत्या!


 

First Published on: September 17, 2020 5:06 PM
Exit mobile version