Parag Agrawal: Twitter CEO पराग अग्रवाल यांच्या देशी सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ

Parag Agrawal: Twitter CEO पराग अग्रवाल यांच्या देशी सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ

Parag Agrawal : Twitter CEO पराग अग्रवाल यांच्या देशी सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ

जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म ट्वीटरचे नवे सीईओ भारतीय वंशाचे पराग अग्रवाल झाले आहेत. आता ट्वीटरचा कारभार मुंबईकर असलेले पराग अग्रवाल सांभाळणार आहेत. आयआयटी बॉम्बमधून ग्रॅज्युएट झालेले पराग अग्रवाल यांनी जॅक डोर्सी यांची जागा घेतली आहे. काल जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि पराग अग्रवाल यांची सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली. २०११ पासून पराग अग्रवाल ट्वीटरसोबत जोडले गेले आहेत. यापूर्वी याहू आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपनीसोबत त्यांनी काम केले आहे. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सीईओ झालेले पराग अग्रवाल यांचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटरवर सध्या तुफान फॉलोअर्स वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर पराग अग्रवाल यांचे काय प्रोफाईल आहे आणि त्यांचे किती फॉलोअर्स आहेत ते पाहा..

ट्वीटरची सीईओ झालेले पराग अग्रवाल सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतात हे त्यांच्या प्रोफाईलवरून स्पष्ट होत आहे. ट्वीटवर पराग अग्रवाल यांचे २०३.४के फॉलोअर्स आहेत. तर फॉलोईंग १,३३९ इतकी आहे. ट्वीटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स हळूहळू वाढताना दिसत आहेत. काल त्यांनी ट्वीटरचे सीईओ झाल्यानंतर ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यापूर्वी त्यांनी १० नोव्हेंबरला दोन पोस्ट ट्वीट केले होते आणि त्याआधी ११ सप्टेंबरला रिट्वीट केले होते.

बातमी लिहित असताना पराग अग्रवाल यांचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स २ हजार ८३७ इतके होते. पण ट्वीटरच्या सीईओपदी त्यांची नियुक्त झाल्यापासून मिनिटा-मिनिटाला त्यांचे फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत इन्स्टाग्रामवर त्यांना १३८ पोस्ट केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी शेवटची पोस्ट १६ डिसेंबर २०१७ साली केली होती.


हेही वाचा – Who is Parag Agarwal: जॅक डोर्सी यांनी ट्वीटरच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा, कोण आहेत ट्वीटरचे नवे सीईओ?


First Published on: November 30, 2021 11:38 AM
Exit mobile version