हैदराबादच्या ‘सलीम लाला’ने फ्लिपकार्टला दिला भन्नाट पत्ता

हैदराबादच्या ‘सलीम लाला’ने फ्लिपकार्टला दिला भन्नाट पत्ता

हैदराबादच्या 'सलीम लाला'ने फ्लिपकार्टला दिला भन्नाट पत्ता

कोरोना महामारीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड झाले होते. अशातचं अनेकांनी ऑनलाइन श़ॉपिंग करण्यावर अधिक भर दिला. मोबाईल, लॅपटॉप इतकचं नाही वानसामान देखील ऑनलाइन मागवले जात होते. मात्र ऑनलाईन सामान मागवत असताना दिलेल्या पत्त्यामध्ये काही चूक झाल्यास डिलीव्हरी बॉयला ऑनलाईन पार्सल पोहचवताना अडचणी येतात. अशाच एका हैदराबादच्या सलीम लालाने फ्लिपकार्टला भन्नाट पत्ता देत गंमत केली आहे.


या पत्त्याचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा पत्ता वाचून तुम्ही अगदी पोट धरुन हसाल यात शंका नाही. अरुण बोथ्रा नावाच्या एका ट्विटर युझर्सने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसह कॅप्शन देत लिहिले की, हैद्राबादी स्टाइल अॅड्रेस.. हा एका पार्सलाचा फोटो आहे… ज्यावर ग्राहकाचे नाव सलीम लाला लिहित पत्ता लिहिला आहे की. १२-२४/z1 पाशा भाईच्या दुकानात येऊन विचारा, सलीम लाला कुठे राहतो. तिथे कोणीही सरळ घरी आणून सोडेल. चारमीनार, हैदराबाद. या फोटोला ट्विटरवर २ हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या असून अनेकांनी अगदी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. याआधीही असे मजेदार फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत.


हेही वाचा – मोनालिसा देतेय Safe Driving धडे; मुंबई पोलिसांची भन्नाट आयडिया!
First Published on: January 16, 2021 4:32 PM
Exit mobile version