या गाढवाला गुळाची चव आहे!

या गाढवाला गुळाची चव आहे!

दहा लाक रुपयांचे गाढव

आपल्याकडे ‘गाढवाला गुळाची चव काय!’ अशी फार प्रचलित म्हण आहे. परंतु, हरियाणाच्या एका गाढवाने या म्हणीला सपशेल खोटे ठरवले आहे. या गाढवाला दिवसभरातून एकदा तरी जेवनात गुळ लागतो. या गाढवाचा आवडता खाद्यपदार्थ लाडू आणि गुळ आहे. या गाढवाची महतीही इतकी अगाध झाली आहे की, हरियाणाच्या आसपासच्या राज्यांमधून लोक फक्त या गाढवाला पाहायला येतात. त्यामुळे या गाढवाविषयीच्या चर्चांना उधान आले आहे.

दहा लाखांचे गाढव!

आतापर्यंत आपण घोड्यांच्या, बैलांच्या किंवा गाई-म्हशींबद्दल चर्चा एकल्या असतील. परंतु, सध्या हरियाणातील एका गाढवाच्या चर्चांना उधान आले आहे. या चर्चांमधील कारणही तितकेच खास आहे. या गाढवाची किंमत अवघी १० लाख रुपये इतकी आहे. हरियानामध्ये कोट्यावधी रुपयांचे घोडे नेहमीच प्रसिद्धी आणि चर्चेचे विषय ठरले आहेत. त्याप्रमाणे आता गाढव देखील चर्चेचे विषय ठरताना दिसत आहे. टीपू असे या गाढवाचे नाव आहे. टीपू हा काही साधारण गाढव नाही, त्याची तुलना कुठल्याच साधारण गाढवाशी होऊ शकत नाही. त्याची उंचीच साडे पाच फूट इतकी आहे. या गाढवामध्ये घोड्यासारखी शक्ती आहे.

५ लाख रुपयात मागणी

हरियाणाच्या सोनीपत जिल्हाच्या नयाबास गावातील रजनीश नावाच्या मालकाने या गाढवाची किंमत १० लाख रुपये असल्याचे सांगितले. रजनीशचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. रजनीशने पालनपोषण केलेल्या टीपू गाढवावर आता पर्यत ५ लाख रुपयांची बोली लागली आहे. परंतु, रजनीशने या गाढवाची किंमत १० लाख रुपये सांगितली आहे. रवीशने १५ वर्षांपूर्वी या गाढवाच्या आईला विकत घेतले होते. शिवाय, आतापर्यंत २ ते ३ लाखांचे घोडेही त्याने विकले आहेत.

गाढवाचा दिवसाचा खर्च हजार रुपये

न्युज१८ या वृत्तवाहीनीशी बोलताना रजनीशने सांगितले की, ‘या गाढवाला एका दिवसाला हजार रुपये खर्च येतो. हा गाढव दररोज ५ किलो चणे खातो त्याचबरोबर त्याला दिवसातून एक वेळ गोड खाद्य पदार्थ लागते. टीपूला लाडु आणि गुळ हे खाद्यपदार्थ खुप आवडतात’. महाराष्ट्रात प्रचलित असलेली ‘गाढवाला गुळाची चव काय’, ही म्हण टीपूने सपशेल खोटी ठरवली आहे. रजनिशचा मुलगा सुमित म्हणतो की, ‘आपल्या वडिलांबरोबर मी देखील त्या गाढवाच्या पालनपोषणाकडे लक्ष देतो. शाळा सुटल्यानंतर या गाढवाला शेतात चारण्यासाठी घेऊन जातो. शिक्षणाबरोबरच तो आपल्या वडिलांना कामात मदत करतो’.

First Published on: June 28, 2018 7:00 PM
Exit mobile version