नवरा माझा फोटो डीपीत ठेवत नाही, बायकोची पोलिसांत अजब तक्रार

नवरा माझा फोटो डीपीत ठेवत नाही, बायकोची पोलिसांत अजब तक्रार

नवरा माझा फोटो डीपीत ठेवत नाही, बायकोची पोलिसांत अजब तक्रार

नवरा बायकोमध्ये भांडणे ही होतचं असतात. परंतु भांडणे कोणत्या कारणावरून होतील याचा काही नेम नाही. अगदी छोट्याछोट्या गोष्टींवरूनही नवरा बायकोमध्ये खटके उडतात. परंतु व्हॉटसअॅपमुळे संसारात मिठाचा खडा पडला आणि संसार मोडला अशी घटना आपण कधी ऐकली का? पण अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमध्ये निमित्त ठरले ते म्हणजे व्हॉट्सअॅप डीपी. पुण्यातील एका उच्चशिक्षित महिलेने माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पती त्यांचा डिपी ठेवतात पण माझा पती ठेवत अशी अजब तक्रार पोलिस स्थानकात केली. या कारणावरुन महिलेची आपल्या पतीसोबत सतत वाद होत होते. यानंतर पोलीसांनी हे प्रकरण भरोसा सेलकडे पाठवले. भरोसा सेलने या दोघांची मते ऐकून घेत त्यांच्यातील वाद मिटवून दिला. त्यानंतर दोघांचा संसार पुन्हा गुण्यागोविंदाने सुरु झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजाता शानमे यांच्याकडे हे प्रकरण आले होते. यावर माहिती देताना त्या म्हणाल्या की, आमच्या विभागात कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी येत असतात. अशीच एक तक्रार एक महिला घेऊन आली होती. या महिलेने आपल्या कौटुंबिक वादाची लेखी तक्रार आमच्याकडे दिली होती. यावर महिलेने सांगितले की, माझा पती माझ्याकडे लक्ष देत नाही. मला वडील नसल्यामुळे माझ्या आई आणि लहान बहिणीची जबाबदारी मला सांभाळावी लागते. माझी आई आणि बहिण माझ्या माहेरीच राहते. माझा पती आणि मी जमेल तशी त्यांनी मदत करतो. त्यांच्या अडीअडचणींच्या वेळी धावून येतो. आम्हा पतीपत्नीमध्ये अशी टोकाची भांडणे नाहीत. दोघांचे संबंध खूप चांगले आहे. त्यामुळे पतीकडून असा मानसिक त्रास नाही. अशा सर्व कैफियत पोलीस निरीक्षक सुजाता यांनी ऐकूण घेतली. यावर नेमका तुम्हाला पतीकडून कोणता त्रास होत आहे असे जेव्हा पोलीस निरीक्षक सुजाता यांनी विचारले तेव्हा ती महिला सांगू लागली, माझा पती माझा फोटो व्हॉट्सअॅपला डीपी म्हणून ठेवत नाही म्हणून मी नाराज आहे.

यावर महिलेच्या पतीशी बोलण्यात आले त्यावर तो म्हणाला, मी माझ्या पत्नीची सगळी काळजी घेतो. तिला हवे नको ते पाहतो. त्याचबरोबर माझ्या पत्नीच्या बहिणीचा शिक्षणाचा खर्च उचलतो. सासुबाईंची काळजी घेतो. त्यांच्या डॉक्टरांपासून ते आर्थिक अडचणींना मदत करतो. पण माझी पत्नी मी तिचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप डीपीला ठेवत नाही म्हणून माझ्याशी वाद घालत राहते. त्यामुळे आता मी नेमकं काय करावं हे समजत नाही आहे. यानंतर भरोसा सेलने या महिलेचे समुपदेशन करत एवढ्या शुल्लक कारणांवरून वाद घालणे चुकीचे असून प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप डीपी किंवा इतर काही महत्त्वाचे नसुन तुम्ही एकमेकांशी किती प्रेमाने बोलता वागता हे महत्वाचे आहे अशी जाणून महिलेला करून दिली. यावर महिलेनेही आपण पतीशी या शुल्लक कारणावरून वाद घालणार नाही असे आश्वासन दिले. नंतर दोघांनीही भरोसा विभागातून बाहेर पडताना एकमेकांबद्दल कधीच अशा प्रकारची भावना येणार नाही असे वचन देत निघून गेले.

 

First Published on: March 5, 2021 6:09 PM
Exit mobile version