तनुश्रीच्या इशाऱ्यावरुनच रेसलरने मला आपटले; राखी सावंत

तनुश्रीच्या इशाऱ्यावरुनच रेसलरने मला आपटले; राखी सावंत

तनुश्री दत्ता आणि राखी सावंत पुन्हा आमने-सामने

#MeToo मोहीमेनंतर राखी सावंत आणि तनुश्री दत्ता यांच्यात निर्माण झालेला वाद नवा नाही. आता यामध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. अमेरिकन रेसलर रोबेलने राखी सावंतला रिंगणात जोरदार आपटल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून राखीने या प्रसंगाचा आता एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तनुश्री दत्तानेच मला मारण्याचे षडयंत्र केले असल्याचे सांगत आहे.

राखीने अपलोड केलेल्या व्हिडिओला जे कॅप्शन लिहिले आहे त्यात ती म्हणते की, “त्या रेसलरने तनुश्रीच्या सांगण्यावरुनच मला आपटले. तनुश्रीला वाटत नाही की नृत्य करावं. तनुश्रीने यासाठी त्या रेसलरला पैसेही दिले. भारत आणि अमेरिकेतील माझ्या चाहत्यांनो माझ्या पाठी खंबीर उभे रहा.”, असे राखी सावंतने सांगितले आहे.

या व्हिडिओत खली राखीला तिच्या तब्येतीबद्दल विचारतो आणि मग राखी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचते. “मी तर फक्त तिथे नाचण्यासाठी गेले होते, पण अचानक त्या रेसरलने मला उचलून आपटले. ती वेडी झाली होती.” रेसरलचा काहीतरी गैरसमज झाला असल्याचे यावेळी खलीने सांगितले.

हरयाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल या नावाखाली रेसलिंगचे सामने रंगणार आहेत. याच्या सोहळ्यानिमित्त राखी सावंत याठिकाणी आपले नृत्य सादर करण्यासाठी आली होती. रेसलिंग सुरु होण्याआधी ते रेसलर सोबत थिल्लर नृत्य करताना दिसत आहे. त्यानंतर रेसरलने तिला अचानक हवेत उचलून जमिनीवर आपटले.

दुखापत झाल्यानंतर आता राखीला घरी सोडण्यात आले आहे. त्याचाही व्हिडिओ राखीने शेअर केला आहे.

First Published on: November 13, 2018 3:38 PM
Exit mobile version