‘कुवारा बाप’ होण्याचा सल्ला राणीने सलमानला दिला

‘कुवारा बाप’ होण्याचा सल्ला राणीने सलमानला दिला

बॉलिवूडमधला चाहत्यांचा लाडका अभिनेता सलमाने पन्नाशी ओलांडली आहे. तरी तो लग्नाचे नाव घेत नाही म्हणूनच त्याची मैत्रिण राणी मुखर्जीने त्याला लग्न न करताच बाबा हो असा सल्ला दिला आहे.

का दिला राणीने सल्ला

‘दस का दम’ या रिअॅलिटी शोच्या एका टास्क दरम्यान सलमान ज्याप्रकारे लहान बाहुलीची देखभाल करत होता, ते पाहून राणी मुखर्जीने सलमानला हा सल्ला दिला आहे. ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोमध्ये राणीने शाहरुख खानसोबत हजेरी लावली होती. त्याच्या प्रोमोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये राणी मुखर्जीने सलमानला लग्न न करता बाबा होण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या बॉलिवूड कलाकारांमध्ये लग्नाचे वारे वाहत असतात. त्यावेळी सलमान लग्न केव्हा करणार हा प्रश्न उपस्थित होतो. अनेक कलाकार मंडळी लग्नाच्या तयारीत असतात. या लग्नांच्या चर्चांमध्ये पहिले नाव येते ते सलमान खानचे. त्याच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते सलमान लग्न केव्हा करणार? मात्र याला राणी मुखर्जी अपवाद ठरली आहे. राणीने लग्न करु नकोस. लग्न न करताच बाबा होण्याचा सल्ला सलमानला दिला आहे. त्यामुळे या रिअॅलिटी शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा या दोघांची मैत्री चाहत्यांना पाहिला मिळाली.

First Published on: August 29, 2018 11:06 PM
Exit mobile version