जिंकलंत टाटा! बॉडीगार्डशिवाय चक्क नॅनोमधून रतन टाटा ‘ताज’मध्ये पोहोचले

जिंकलंत टाटा! बॉडीगार्डशिवाय चक्क नॅनोमधून रतन टाटा ‘ताज’मध्ये पोहोचले

जिंकलंत टाटा! बॉडीगार्डशिवाय चक्क नॅनोमधून रतन टाटा 'ताज'मध्ये पोहोचले

बड्या व्यक्तींमध्ये एक खास साधेपणा लपलेला असतो आणि हाच साधेपणा देशातील ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या कृतीतून दिसून येतो. रतन टाटा यांना त्यांच्या साध्या राहणीसाठी ओळखले जाते. त्यांच्या अनेक साध्या राहणीमानाच्या कृतीने आजवर अनेकांची मनं जिंकली. दरम्यान रतन टाटांचा एक असाच व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. उद्योगपती रतन टाटा स्वत: देशातील सर्वात मोठ्या कार कंपनीचे मालक असताना त्यांनी चक्क कंपनीची सर्वात स्वस्त नॅनोमधून ताज हॉटेलमधून एन्ट्री घेतली. टाट यांची या साध्या एन्ट्रीने अनेकांची मनं जिंकून घेतली, या व्हिडिओमध्ये रतन टाटा त्यांच्या ‘ड्रीम कार’मधून ताज हॉटेलमध्ये जात असल्याचे दिसते. त्यामुळे अनेकांच्या मनात घर करणाऱ्या टाटांनी पुन्हा एकदा सगळ्यांना अवाक् केलं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पर्सनल बॉडीगार्डशिवाय रतन टाटा त्यांच्या कारमधून ताजमध्ये पोहचले.

या व्हिडिओमध्ये दिग्गज उद्योगपती रतन टाटा हॉटेल ताजच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रतन टाटा यांची नॅनोतली ही हटले एन्ट्री सर्वसामान्यांना आपलीशी करणारी वाटतेय. हल्ली अनेक बडे नेतेमंडळी, उद्योगपती, अभिनेते, सेलिब्रिटी सर्वांना अलिशान गाड्यांमधून फिरण्याचा शौक असल्याचे आपण पाहतो. गावच्या सरपंचापासून ते नगरसेवकापर्यंत बीएमडब्यू, ऑडी, इनोव्हाशिवाय फिरत नाही. अशा जमान्यात जेव्हा स्वत: बड्या कार कंपनीचा मालक नॅनो या सर्वात स्वस्त कारमधून ताजसारख्या भव्य हॉटेल स्वत: च्या हॉटेलमध्ये येतो ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविकचं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनाही रतन टाटांचा हा साधेपणा चांगलाच आवडला आहे.

एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे रतन टाटा सफेद कलरच्या नॅनो कारमधून आले, यावेळी त्यांच्यासोबत कोणीही बॉडीगार्ड नव्हता किंवा सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हती. हा व्हिडीओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी ताज हॉटेलवर फक्त कर्मचारी होते.दरम्यान सोशल मीडियावरही रतन टाटा यांच्या साधेपणाने कौतुक होत आहे.


मुंबईत नाल्यांमधील गाळ काढण्याचे ७८ टक्के काम पूर्ण – आदित्य ठाकरे

First Published on: May 19, 2022 1:38 PM
Exit mobile version