रिस्क है तो इश्क है ! मैत्रीणीला सुटकेसमधून न्यायचा प्लान फसला अन् झाली गोची

रिस्क है तो इश्क है ! मैत्रीणीला सुटकेसमधून न्यायचा प्लान फसला अन् झाली गोची

रिस्क है तो इश्क है ! मैत्रीणीला सुटकेसमधून न्यायचा प्लान फसला अन् झाली गोची

सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, काही मुलं एका मुलीला सुटकेसमधून लपवत हॉस्टेलच्या बाहेर नेत आहेत. मात्र अचानक हॉस्टेलच्या एका सेक्युरिटी गार्डला चेकिंगच्यावेळेस या पठ्ठ्यांनी केलेला सारा प्रकार समजला.या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका कॉलेज हॉस्टेलमधील काही मुलांनी चक्क एका सुटकेसमध्येच मुलीला लपवले आहे. याशिवाय तीच सुटकेस ही मुलं बिधास्तपणे बाहेर घेऊन जात असतानाच, गेटच्या बाहेर असणाऱ्या वॉचमनने त्यांनी अडवले. त्यानंतर सुटकेसची तपासणी केल्यावर त्यामधून चक्क मुलगी बाहेर पडल्याचे पाहिल्यावर वॉचमन चकितच झाला. दरम्यान, हा व्हिडीओ कर्नाटकमधील मणिपालच्या विद्यार्थ्थांचा असल्याचे बोलले जात आहे.

 

ज्याप्रकारे सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल झाला त्याचप्रमाणे वेगवगळ्या कमेंट या व्हिडीओसाठी आल्या काहींना हा व्हिडीओ फारच मजेशीर वाटला तर काहींना या व्हिडीओवर नकारात्मक कमेंटही दिल्या आहेत.एका युझरने कमेंट केली आहे की, ‘या मुलाच्या गर्लफ्रेंडला सुटकेसमधून फिरायला आवडत असेल’ तर एक म्हणाला, हा तर valentine day चा नवा फंडा. दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर अनेक युझर्सने शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारापेक्षा अधिक व्ह्यूज आहेत. बऱ्याच ट्विटर युझर्सने या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. त्यामुळे #Manipal Suitcase असं सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे.


हे ही वाचा – Mega Block: मध्य रेल्वेवर ‘या’ दिवशी ७२ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, ४३७ गाड्या रद्द, पाहा संपूर्ण वेळापत्रक


 

First Published on: February 3, 2022 5:56 PM
Exit mobile version