सचिनची पश्चिम रेल्वेकडून नवी ‘इनिंग’

सचिनची पश्चिम रेल्वेकडून नवी ‘इनिंग’

मास्टल ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या समाजसेवेसाठीही ओळखला जातो. भारतीय संघासाठी खेळत असल्यापासून समाजकार्यात सक्रिय असलेला सचिन, आता पश्चिम रेल्वेचा चेहरा बनला आहे. महिला सुरक्षा, रेल्वे रूळ ओलांडणं आणि स्वच्छता या तीन प्रमुख मुद्द्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सचिन तेंडुलकर पश्चिम रेल्वेकडून जनजागृती करण्यात येणार आहे. सचिन पश्चिम रेल्वेचा दूत बनत या विषयांवरील जनजागृती करणार आहे. याच पार्श्वभूमीवर सचिनने ‘रेल्वे रुळ ओलांडू नका, घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे’, अशाप्रकारचा संदेश दिला आहे. दरम्यान सचिन देणार असलेल्या या सामाजिक संदेशाची चित्रफीत चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार असल्याची, तसंच याची ध्वनिफीत रेडिओवर ऐकवली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

लोकल ट्रेनशी जवळचं नातं

काही दिवसांपूर्वी सचिनने जनजागृतीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी पश्चिम रेल्वेची भेट घेतली होती. यावेळी रेल्वे बोलताना सचिनने लोकल ट्रेनसोबतच्या त्याच्या आठवणी शेअर केल्या. ‘वानखेडे’ मधील क्रिकेटच्या सरावासाठी आपण केलेल्या वांद्रे ते चर्चगेट प्रवासाबद्दल सचिन भरभरुन बोलला. यावेळी लोकल ट्रेनशी आपलं जवळचं नात असल्याचंही तो म्हणाला. यावेळी रेल्वे रुळ न ओलांडण्याचा संदेश देण्यासोबतच सचिनने अन्य काही लोकोपयोगी सल्लेही दिले. पादचारी पूलांचा तसंच सबवेचा वापर करा, सरकते जिने वापरा अशी सूचना त्याने पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून दिली. याशिवाय महिला प्रवाशांची सुरक्षा खूप महत्वाची असल्याचं म्हणत, त्याने माहिलांसाठी असलेल्या १८२ या हेल्पलाईन क्रमाकांचा तसंच मोबाईल अॅपचा सर्वांनीच वापर करावा, असे आवाहनही केले.

 

 

First Published on: July 24, 2018 10:48 AM
Exit mobile version