सावधान! Googleवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

सावधान! Googleवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधताय?  तर ही बातमी तुमच्यासाठी

सावधान! Googleवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

बँकेसंबंधी महत्त्वाचे काम करायचे आहे किंवा एखादी अडचण असेल मात्र बँकेत जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये अशा वेळी आपण गूगलवर जाऊन बँकेचा कस्टमर केअर नंबर मिळवतो आणि त्यावर फोन करतो. मात्र बऱ्याचदा याच माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात येते. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून याबाबत एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्य: प्रसिद्ध बँकेच्या कस्टमर केअर नंबरवरुन अशाप्रकारे फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बॅकेच्या नावाखाली कस्टमरचे आर्थिक नुकसान करण्याचे प्रकार वाढत असल्याने SBI ने सर्व कस्टमर केअरना चेतावणी दिली आहे.

कस्टमर गूगलवर जाऊन बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर शोधतात. त्यात टॉप सर्चमध्ये एक वेब साइट दिसते. ती वेब साइट बँकेची वेबसाइट समजून त्यावर असलेल्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केला जातो. हँकर्स कॉल केल्यावर कस्टमरचे सर्व बँक डिटेल्स विचारतात. कस्टमर मोठ्या विश्वासाने सर्व बँक डिटेल्स फ्रॉडर्सना देतात. याचाच फायदा घेऊन हँकर कस्टमरच्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करुन त्यांची आर्थिक फसवणूक करतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गूगलवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे धोकादायक झाले आहे. कस्टमरनी बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर शोधण्यासाठी नेहमी बँकेच्या अधिकृत वेबसाइला विझीट करा. अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी युझर्सनी कधीही ओटीपी, आपला डेबिट क्रेडिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकींग पासवर्ड किंवा युझर नेम तसेच बँकेसंबंधीत कोणतेही डिटेल्स शेअर करू नये. KYC अपडेट करणारी लिंक बऱ्याचदा सेंड केली जाते मात्र अशाप्रकारे कोणतीही बँक KYC अपडेशनसाठी लिंक सेंड करू शकत नाही हे लक्षात ठेवा.


हेही वाचा – ब्रिजवर उभ्या असलेल्या गायीला ट्रेनची धडक अन् पुढे काय झालं ? Video पाहून व्हाल थक्क

First Published on: December 27, 2021 6:16 PM
Exit mobile version