बाजारात मकर संक्रांतीची खरेदी सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

बाजारात मकर संक्रांतीची खरेदी सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

शेअर बाजार

मकर संक्रांतीला, मंगळवारी शेअर बाजार तेजीत बंद झाला. चौफेर झालेल्या खरेदीमुळे सर्वच निर्देशांक हिरव्या रंग ल्यायले होते. महागाई दराबाबत चांगल्या आकडेवारीने गुंतवणुकदारांचा उत्साह वाढला होता.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४६८ अंकांची (१.३० टक्के) वाढ होऊन तो ३६,३१८ अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक, निफ्टीत १४९ अंकांची (१.३९ टक्के) तेजी येते होते. १०,८८७ अंकांवर बंद झाला. मकर संक्रांतीला गुंतवणुकदारांनी चांगली खरेदी केल्यामुळे स्मॉल कॅप आणि मिडकॅप निर्देशांकात तीन चतुर्थांश टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

५० कंपन्यांच्या निफ्टीत विप्रोच्या शेअर्समध्ये ५.५ टक्के इतकी मोठी वाढ झाली. त्यानंतर यस बँक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांता, टीसीएस, हिंदुस्तान पेट्रोलियम, अदानी पोर्ट्स आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये ३ ते ४ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली.

दुसरीकडे निर्देशांकात मारुती सुझुकीच्या शेअर्स ०.८ टक्क्यांपर्यंत खाली आले. याशिवाय पावर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, भारतीय इंफ्राटेल यांचे शेअर्सही घसरले होते. मात्र ही घसरण मामुली होती.

मंगळवारी सर्व क्षेत्रातील निर्देशांक तेजीत बंद झाले. आईटी निर्देशांकाने ३ टक्क्यांपेक्षा मोठी उडी मारली. निर्देशांकावर फक्त एनआईआईटी टेक्नॉलॉजीचे शेअर्स कमजोर पडले होते. इंफीबीमच्या शेअर्सने १० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली. मुंबई शेअर बाजारात केवळ तीन कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. तब्बल २७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. १,५५६ शेअर्समध्ये वाढ झाली तर १,००९ शेअर्समध्ये घसरण झाली होती.

First Published on: January 16, 2019 4:03 AM
Exit mobile version