भारतीय क्रिकेटपटूंची प्रशंसा शोएब अख्तरला पडली महाग

भारतीय क्रिकेटपटूंची प्रशंसा शोएब अख्तरला पडली महाग

-शोएब अख्तर

भारताचा इंग्लंड दौरा सध्या सुरू आहे. ज्यात भारताने टी-२० सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा पराभव केला. ज्यामुळे क्रिकेट जगतातून भारतीय संघावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. याचवेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरनेही भारतीय क्रिकेटपटूंची प्रशंसा केली. मात्र ही प्रशंसा त्याला चांगलीच महाग पडली आहे. त्याला पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे.

काय आहे शोएबचे ‘ट्विट’?

शोएबने आपल्या ऑफिशिअल ट्विचर हँडलवर एक टि्ट केले. ज्यात त्याने भारतीय संघाला इंग्लंडविरूद्धच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. सोबतच त्याने सामन्यात अप्रतिम खेळी केलेल्या रोहीत शर्माचे विशेष कौतुक केले. त्याने लिहिले होते की, “पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर आणि भारताने इंग्लंडवर अप्रतिम विजय मिळवला, मात्र या सर्वात रोहित शर्माने उत्तम खेळी खेळली.” .

पाकिस्तानी चाहत्यांकडून झाला ट्रोल

शोएब अख्तरने भारतीय संघाचे कौतुक केले, त्यात खास करून रोहित शर्माचेही त्याने कौतुक केले. ज्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला ट्रोल करत ‘रोहितला दत्तक घे’ असे सुनवले, तर ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात आक्रमक अर्धशतकी खेळी करणाऱ्या फखार झमानचा उल्लेख का केला नाहीस?’ असा सवालही चाहत्यांनी शोएबला केला.

First Published on: July 10, 2018 9:09 PM
Exit mobile version