Viral Photo: ‘या’ देशात -45℃ तापमान!, हवेतच नूडल्स अन् अंड गोठलं!

Viral Photo: ‘या’ देशात -45℃ तापमान!, हवेतच नूडल्स अन् अंड गोठलं!

Viral Photo: 'या' देशात -45℃ तापमान!, हवेतच नूडल्स अन् अंड गोठलं

जगभरात सध्या हिवाळा सुरू झाला आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यात पारा घसरल्याने राज्यात हुडहुडी भरली आहे. तर जगभरातील काही भागात बर्फाने चादर पसरली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. मात्र, -45℃ तापमानातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगातील सर्वात कमी तापमान असलेल्या ठिकाणांमध्ये सायबेरियाचा समावेश होतो आणि या ठिकाणचा सायबेरियातील हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे.

ट्विटर यूजर ओलेग या नावाच्या व्यक्तीने नूडल्स आणि अंड्याचा एक फोटो ट्विट केला. हा फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओलेगने हा फोटो नोवोसिबिरस्‍क या शहरात क्लिक केला होता. सोमवारी या शहराचे तापमान -45℃ सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. सायबेरियातील नोवोसिबिरस्‍क शहरात -45℃अंश सेल्सिअस इतके तापमान झाले असल्याचे ट्विट करत त्याने हा फोटो शेअर केला.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या या फोटोला नेटिझन्सकडून चांगल्याच कमेंट आणि शेअर्स मिळताय. आतापर्यंत या फोटोला ५८.६ हजार लोकांनी लाईक केले आहे तर १८ हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला रिट्विट केले आहे. सायबेरियातील तापमान कसे असते हे तुम्हाला अनुभवता येणार नाही. मात्र या व्हायरल होणाऱ्या फोटोवरून तुम्हा नक्की तिकडे असणारी थंडी लक्षात येईल. या फोटोत अंडं फोडल्या-फोडल्या त्यातील बल्क गोठलेलं दिसतंय तर ते अंडे हवेत राहिले होते. तर, दुसऱ्या बाजूला नुडल्सही इतके कडक झाले होते. त्यामुळे चमच्याला एका अदृष्य हाताने पकडल्याचा भास होतोय.

First Published on: December 30, 2020 3:36 PM
Exit mobile version