रोबो बनणार मुलांचा ‘बेस्ट फ्रेंड’

रोबो बनणार मुलांचा ‘बेस्ट फ्रेंड’

फोटो सौजन्य - avatar mind/ looooker.com

दोन्ही पालक नोकरीवर जाणारे, विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यातही ‘हम दो हमारा एक’ या मानसिकतेमुळे घरात एकच आपत्त्य.. असं चित्र आता आपल्याकडेही बहुतांशी घरात पाहायला मिळते आहे. खेळायला, बोलायला कोणीच नसल्यामुळे घरात दिवसदिवस एकटीच राहणारी मुलं एकलकोंडी बनत चालली आहेत.

‘चीन’मध्ये आहे परंपरा

आपला शेजारी देश असेलल्या चीन देशामध्ये अफाट लोकसंख्या आहे. त्यामुळे चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘एक कुटुंब- एक मूल’ अशी योजना राबवली जात आहे. त्यामुळे तिथल्या बहुतांशी घरातील मुलांमध्ये आई-वडील कामासाठी बाहेर असल्यामुळे आणि घरात सोबतीला भावंड नसल्यामुळे एकटेपणा वाढतो आहे. परिणामत: कायम स्वत:च्याच दुनियेत रमणारी ही मुलं मोठ्याप्रमाणावर एलकोंडी बनत आहेत.

समस्या दूर करणार रोबो

दरम्यान चीनमधील स्थानिक रहिवाशांसाठी ही समस्या गेल्या काही वर्षांपासून खूपच गंभीर बनली आहे. आपल्या मुलांचा एकलकोंडेपणा कसा घालवावा ही प्रश्न पालकांना पेचात टाकणारा आहे. मात्र, यावर उपाय म्हणून चीनच्या एका कंपनीने खास ‘रोबो’ची निर्मिती केली आहे. ‘आयपल’ असं या रोबोचं नाव असून तो चीनमधल्या मुलांचा सवंगडी बनणार आहे.

‘आयपल’ रोबोची वैशिष्ट्यं

एकलकोंड्या बनलेल्या मुलाला ‘आयपल’ रोबो नक्कीच सोबत करेल, असा विश्वास रोबो तयार करणाऱ्या कंपनीने व्यक्त केला आहे. नुकतंच चीनच्या शंघायमध्ये या अनोख्या रोबोचं लाँचिंग करण्यात आलं. जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्यं –

थोडक्यात चीनमधील पालकांना त्यांच्या मुलांचा एकटेपणा दूर करण्यामध्ये हा आयपल रोबो मदतगार ठरणार आहे. चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या या रोबोची किंमत भारतीय चलनानुसार ९५ हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांना हा रोबो परवडणार का? ही देखील विचार करण्याची बाब आहे.

पाहा या रोबोचा भन्नाट व्हिडीओ :

(व्हिडिओ सौजन्य- Hindustan times)

First Published on: June 19, 2018 11:27 AM
Exit mobile version