सर्चमध्ये पुन्हा एकदा सनी लिओनीच अव्वल

सर्चमध्ये पुन्हा एकदा सनी लिओनीच अव्वल

(फोटो सौजन्य - Instagram)

बॉलिवूडमधली अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा सर्चमध्ये अव्वल ठरली आहे. २०१४ मध्ये देखील गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी सनी लिओनी पुन्हा एकदा बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना मागे टाकत फेसबुक सर्चमध्ये नंबर वन ठरली आहे.

सनी लिओनीने पटकावल पहिलं स्थान

अमेरिकेच्या स्कोर ट्रेण्ड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीच्या माहितीनुसार सनी लिओनी सर्वात जास्त लोकप्रिय असल्याचे समोर आले आहे. स्कोर ट्रेण्ड्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ही यादी तयार केली. या यादीत तिने १०० गुणांसह पहिलं स्थान पटकावलं. या यादीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने ९० गुण मिळवत ‘मोस्ट एंगेंजिंग फेसबुक सेलिब्रिटी’च्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. तर माधुरी दीक्षितने ८६ गुण मिळवत तिसरी आली असून प्रियांका चोप्राने ८४ गुण मिळवत चौथे स्थान मिळवले आहे. तर ८३ गुण मिळवत पाचव्या स्थानावर जॅकलिन फर्नांडिस स्थान मिळवले आहे.

रिअॅलिटी शोममधून भारतात आली

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मधून भारतात तिने पाऊल टाकले. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये चांगलीच झळकली. सनी लिओनीचा नुकताच वेब बायोपिक तिच्या चाहत्यांच्या भेटीला आला. त्यामुळे ती चर्चेत राहिली आणि तिची लोकप्रियता खूप वाढली. त्याच्यासोबत ती रणविजयसोबत स्प्लिटसविलाच्या अकराव्या सिझनमध्ये पाहायला मिळाली असून तिच्याविषयीच्या पोस्ट फेसबुकवर सर्वाधिक पाहिल्या गेल्या. त्यामुळे सनी लिओनी फेसबुक सर्चमध्ये टॉप आली आहे.

First Published on: August 30, 2018 9:25 PM
Exit mobile version