हंस जो घालतो ‘पायमोजे’ …

हंस जो घालतो ‘पायमोजे’ …

सिंगापूर बर्ड पार्कमधील पायमोजे घालणारा हंस

आपल्या पाळीव प्राण्यांसाठी खास त्यांच्या मापाचे आणि त्यांना शोभतील असे कपडे बनवणं, त्यांना विवधरंगी टोप्या किंवा आभूषणं घालणं हा ट्रेंड तरूणांमध्ये वाढताना दिसतोय. सोशल मीडियावर आपण अशाप्रकारचे अनेक फोटो पाहतो. मात्र चक्क प्राणीसंग्राहलयातील एका प्राण्याला वा पक्ष्याला अशाप्रकारे सजवलं तर? आश्चर्यचकित झालात? जाणून घेऊयात नेमकं काय आहे हे प्रकरण..

‘मोजे’ पहनके चली हंस की सवारी…

अनोखा थाट असलेला हा हंस पक्षी सिंगापूरच्या एका बर्ड पार्कमधील आहे. एका वर्षापूर्वी सिंगापूरच्या ज्युरोड बर्ड पार्कमध्ये त्याचा जन्म झाला होता. एक वर्षाचा हा लहानगा हंस अद्याप नाजूक अवस्थेत आहे. त्याच्या पायाच्या हाडांची पूर्ण वाढ झाली नसल्यामुळे त्याला सिमेंटच्या जमिनीवर चालण्यासाठी त्रास होतो. याच कारणामुळे त्याच्यासाठी विशेष मोजे बनवून घेण्यात आले आहेत. हे मोजे घातल्यावरच तो हंस जमीनीवर व्यवस्थित चालू शकतो. केवळ दीड किलो वजन असलेल्या या हंसाच्या देखभालीसाठी काही तंज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘या हंसाच्या पायांची पूर्णपणे वाढ झाल्यावरच तो बूट न घालता फिरु शकेल’ अशी माहिती संबंधित अधिकारी देतात.

पर्यटकांमध्ये भन्नाट क्रेझ

एखाद्या माणसाप्रमाणे पायांमध्ये बूट घालून थाटात वावरणाऱ्या या हंसाला लोकांचं भरपूर प्रेम मिळतंय. सध्या स्थानिक नागरिकांमध्ये तसंच पर्यटकांमध्ये या आगळ्या-वेगळ्या हंसाबद्दल खूप क्रेझ निर्माण झाली आहे. ठिकठिकाणाहून लोक त्याला पाहण्यासाठी बर्ड पार्कमध्ये गर्दी करत आहेत. सोशल मीडियावरही या हंसाचे फोटो सध्या झपाट्याने व्हायरल होत असून जगभरातील लोकांची त्याला पसंती मिळते आहे.

First Published on: May 23, 2018 8:14 AM
Exit mobile version