Video: लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्यांना पोलिसांनी कोरोना रुग्णासहीत रुग्णवाहिकेत डाबलं… पुढे बघा काय झालं

Video: लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्यांना पोलिसांनी कोरोना रुग्णासहीत रुग्णवाहिकेत डाबलं… पुढे बघा काय झालं

तिरुपुर पोलिसांचा व्हिडिओ

तामिळनाडु पोलिसांचा एक प्रँक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. वारंवार समजावूनही तरुण बाहेर पडल्याशिवाय राहत नाहीत. बाईकवर सैरसपाटा मारणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओत बाईकवरुन आलेल्या काही तरुणांना पोलीस पकडून रुग्णवाहिकेत टाकण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असून आता याची चांगलीच चर्चा होत आहे.

देशभरातील पोलीस लॉकडाऊन मोडणाऱ्यांना विविध शिक्षा देताना दिसत आहेत. कुणी थेट त्यांना सडकून काढतंय, कुणी उठा-बशा घालण्याची शिक्षा देत आहे. तर काहीजणांना शर्ट काढून उन्हात बसण्यास सांगितले जात आहे. पण तामिळनाडुच्या त्रिपुर जिल्ह्यातील पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. बाईक वरुन फिरणाऱ्या तरुणांना पकडून कोरोनाबाधित रुग्णाच्या रुग्णवाहिकेत टाकण्याची शिक्षा देण्यात आली.

अर्थात हा व्हिडिओ खरा नाही. पोलिसांनी काही कलाकारांना घेऊन नाट्यरुपांतर केलेले आहे. कलाकार बाईक वरुन जेव्हा येतात. तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेत टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ते तरुण जीवाच्या आकांताने अॅम्बुलन्समधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र पोलीस पुन्हा पुन्हा त्यांना पकडून आत टाकतात. हा व्हिडिओ जेवढा बघायला मजेशीर वाटतो, तेवढंच त्याच्या बॅकग्राऊंडला गमंतीशीर संगीत देण्यात आले आहे.

व्हिडिओच्या शेवटी पोलीस सर्व कलाकारांसहीत जनतेसाठी एक संदेश देतात. तुम्ही लॉकडाऊनमध्ये बाहेर पडू नका, नाहीतर अशी शिक्षा देण्यात येईल, असे पोलीस सांगतात. सोशल मीडियावर अनेकांना हा व्हिडिओ आवडला असून तो दिवसभर व्हायरल झाला. मात्र काहींनी या व्हिडिओवर टीका केली आहे. पोलिसांनी सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन करुन हा व्हिडिओ बनविल्याचे काहींचे म्हणणे आहे.

तामिळनाडुमध्ये आतापर्यंत १ हजार ६८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७५२ लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना या राज्यांचा विचार केल्यास तामिळनाडुने कोरोनावर नियंत्रण मिळवलेले दिसते.

 

First Published on: April 24, 2020 10:48 PM
Exit mobile version