Google चा वार्षिक अहवाल जाहीर; WFH Job आणि E-Courses ला सर्वाधिक सर्च

Google चा वार्षिक अहवाल जाहीर; WFH Job आणि E-Courses ला सर्वाधिक सर्च

प्रातिनिधीक फोटो

जगभरात सर्वाधिक नावाजलेलं सर्च इंजिन गूगलने २०२० या वर्षात सर्वाधिक सर्च काय करण्यात आले, याचा एक अहवाल सादर केला आहे. ‘Year in Search’ या वार्षिक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे, गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतर भारतात वर्क फ्रॉम होमसह ऑनलाइन कोर्सेस संदर्भात असणारे काम सर्वाधिक युजर्सकडून सर्च करण्यात आले होते. या सादर करण्यात आलेल्या अहवालात या दोन गोष्टींसह आणखी कोणत्या विषयासंदर्भात युजर्सने शोध घेतला वाचा सविस्तर…

या गुगलच्या अहवालानुसार २०२० या वर्षात वर्क फ्रॉम होम करता येणाऱ्या नोकऱ्या सर्च करण्यात आल्या असून त्यामध्ये १४० टक्के वाढ दिसून आली. त्याचबरोबर ऑनलाइन कोर्सेसच्या शोधात ८५ टक्के वाढ दिसून आली. या व्यतिरिक्त सर्टिफिकेट कोर्सेसच्या शोधात ५० टक्के वाढ झाली आहे. इतकेच नाही तर ऑनलाइन वस्तू कशा विकायच्या, यासंदर्भात सर्च करण्यात आलेल्या प्रमाणात ६५ टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. वर्क फ्रॉम होम करता येणाऱ्या नोकऱ्या शोधणाऱ्या युजर्सच्या राज्यात तेलंगना हे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, पद्दुचेरी आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक सर्च करण्यात आले.

यासह वर्क फ्रॉम होम जॉब शोधणाऱ्या शहरांसदर्भात सांगायचे झाले तर महाराष्ट्रातील मीरा भाईंदर शहरातून सर्वाधिक सर्च करण्यात आले. याशिवाय सिकंदराबाद, ठाणे, हैदराबाद, पिंपरी-चिंचवड, गाझियाबाद, बंगळुरू, नवी मुंबई, विशाखापट्टनम आणि मैसूर या ठिकाणी वर्क फ्रॉम होम जॉब या गोष्टीला सर्वाधिक सर्च करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणी केली. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात तर कित्येक जण वर्क फ्रॉम होम करत होते. दरम्यान, नोकऱ्या गेल्याने सर्वाधिक जण हे नोकऱी्च्या शोधात होते. अशावेळी अनेकांनी नोकऱ्या शोधण्यासाठी गुगल या सर्च इंजिनचा आधार घेतल्याचे या गुगलच्या सर्च रिपोर्टमधून समोर आले आहे.

First Published on: March 26, 2021 12:03 PM
Exit mobile version