गांजा मारून उंदीर झाला टल्ली; मालक बुचकळ्यात, नक्की पानं कुणी खाल्ली!

गांजा मारून उंदीर झाला टल्ली; मालक बुचकळ्यात, नक्की पानं कुणी खाल्ली!

दारू, सिगारेट, हुक्का, तंबाखू आणि गांजा याचं व्यसन माणसांना असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. यासोबत गांजाची चोरी माणसांनी केली असल्याचे अनेक प्रकार बातम्यांमधून समोर आले आहेत. मात्र प्राण्यांनी गाजांची चोरी केल्याचे कधी तुमच्या ऐकण्यात आले आहे का! बऱ्याचदा भुकने व्याकूळ होणारे प्राणी घरात घुसून वस्तू किंवा खाद्यपदार्थ चोरून नेल्याचे ऐकले असेल पण कधी प्राण्यांनी गांजाची चोरी करून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार ऐकायला आहे का… नाही नं! मात्र हे प्रत्यक्षात घडलं आहे. उंदराने चक्क गांजाच्या शेतीवर डल्ला मारल्याचे वास्तव समोर आले आणि एकच खळबळ उडाली आहे.

असा घडला प्रकार

कॅनडा इथे एका तरुणाच्या गांजाच्या शेतात उंदराने घुसखोरी केली आणि गाजांची पानं खाण्यास सुरुवात केली. हा उंदीर शेतातलं पिकं खाऊन तेथून पळ काढायचा. त्यामुळे या पिकाची नासाडी कोण करतं हे मालकाला कळत नव्हतं, मात्र मालक एक दिवस या उंदीराला पकडला गेला आणि नेमकं काय झालं ते बघा…

या उंदराचे गांजाची पानं खाताना फोटो कोलिन यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. हा उंदीर त्यांची गाजांची पानं चोरी करून घेऊन जात असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. हा रोज गाजांची पानं चोरी करायचा आणि तो खायचा, जोपर्यंत तो बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा हा दिनक्रम सुरू होता. मात्र एक दिवस उंदराने गांजा खाण्याचा अतिरेक केला आणि तो बेशुद्ध पडला.

 

जास्त गाजां खाऊन उंदीर झाला टल्ली

उंदराने खूप जास्त प्रमाणात गांजाची पानं खाल्ल्यामुळे त्याची अवस्था कशी झाली हे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या उंदराला गांजा चढल्याने त्याची शुद्ध हरपली. सुरुवातीला गाजां खाऊन या उंदरावर कोणताच परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. मात्र एक दिवस त्याने अति गांजा सेवन केल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यांनी या उंदराला पकडून जंगलात सोडल्याचा निर्णय घेतला मात्र गांजा खाण्याची नशा व व्यसनाची सवय झालेला उंदीर माघार घेण्यास तयार नव्हता… सध्या सोशल मीडियावर कोलिन यांची ही स्टोरी खूप व्हायरल होत असून उंदीर देखील चांगलाच व्हायरल होत आहे.


अधिकाऱ्याचं बिंग फुटलं! Corona चं कारण देत घरी जाणं टाळलं; पत्नीनं प्रेयसीसह रंगेहात पकडलं
First Published on: September 11, 2020 8:37 PM
Exit mobile version