महिलांची छेड काढणाऱ्यांनो सावधान! व्हायरल व्हिडिओ

महिलांची छेड काढणाऱ्यांनो सावधान! व्हायरल व्हिडिओ

प्रातिनिधिक फोटो

एकट्या महिलेला हेरून त्यांची छेड काढणारे विकृत लोक अनेक आहेत. अशा लोकांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मात्र काही महिला अशा प्रसंगाना धाडसाने तोंड देतात आणि छेड काढणाऱ्याला चांगलाच धडा शिकवतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला छेडछाड करणाऱ्या पुरुषाचे असे हाल करते की तो पुन्हा कोणत्याही महिलेची छेढ काढण्याचा विचारही करणार नाही.

हा व्हिडिओ एका लिफ्टमधला असून लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एक महिला आपला फोनवर काम करत एकटी उभी आहे. तिच्या मागे असलेला पुरुष तिला मागून न्याहाळत आहे. तिच्या एकटेपणाचा फायदा उचलत तो तिला एकदा स्पर्ष करण्याचाही प्रयत्न करतो. मात्र ती त्याला दाद न देता बाजुला होते. काहीतरी चुकीचे होत असल्याचा भास झाल्यामुळे ती महिला आपला मोबाईल बॅगेत ठेवून देते.

त्यानंतर मात्र तो पुरुष पुन्हा एकदा महिलेच्या जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवतो. त्यानंतर मात्र महिला चांगलीच चवताळते आणि त्याला चांगलेच बुकलून काढते. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर झालेला आहे. त्याला तीन दिवसांत ५० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ भारताबाहेरील असला तरी जगभरातील महिला अशाच पद्धतीने अत्याचाराला बळी पडताना दिसतात. मात्र काहीच महिला त्याचा जोरदार प्रतिकार करतात. या व्हिडिओतील महिलेने जगातील सर्व महिलांसाठी एक ठोस उदाहरण समोर ठेवले आहे.

First Published on: October 22, 2018 12:16 PM
Exit mobile version