Corona: अजूनही ‘या’ गावात आढळला नाही कोरोनाचा एकही रुग्ण!

Corona: अजूनही ‘या’ गावात आढळला नाही कोरोनाचा एकही रुग्ण!

Corona: अजूनही 'या' गावात आढळला नाही कोरोनाचा एकही रुग्ण!

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. पण असे एक गाव आहे, जिथे कोरोनाचा एक रुग्ण आढळलेला नाही आहे. याचे कारण म्हणजे त्या गावातील लोकांनी कोरोना संदर्भातील पाळलेली शिस्त आणि जागरुकता. त्यामुळे सध्या सगळीकडे या कोरोनामुक्त असलेल्या गावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोलंबियातील बोयासा राज्यातील कंपोहेरमोसो काउंटी असं या कोरोनामुक्त असलेल्या गावाचं नाव आहे. या गावात अजूनपर्यंतही एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही आहे.

या गावात ३ हजार लोकवस्ती आहे, पण कोरोनासंदर्भातील पाळलेली शिस्त यामुळे येथे एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही. कँपोहेरमोसो ही काउंटी शेतं आणि लहानलहान खेड्यांनी वाढलेली आहे. संपूर्ण कोलंबियात १ हजार १०० काउंटी आहेत. यापैकी दोन काउंटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही आहे. यामधील दुसऱ्या काउंटीचं नाव सॅन जुआनिटो आहे.

पर्वतांनी वेढलेलं हे गाव असून वाहतुकीच्या रस्त्यांपासून खूप दूर असे गाव आहे. गावात फक्त सात रस्ते आणि सहा चौक आहेत. काउंटी हिरवळीने नटलेले असून ३ हजार ३०० फूट खोल दरीच्या पायथ्याशी वसलेली आहे. या गावातील प्रशासनाने सतत सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा याबाबत अभियान राबवले. त्यामुळे इथला प्रत्येक नागरिक जागरूक आहे.

एक दुकानाचा मालक नेल्सन अविला म्हणाला की, ‘माझ्या दुकानात कोणीही आलं तरी मी त्याला पहिल्यांदा मास्क लावण्यास सांगतो. त्यानंतर त्यांना हात धुवायला सांगतो. ग्राहकांनी दिलेले पैसे अल्कोहोल शिंपडल्याशिवाय घेत नाही. तसेच जे काही बिल असेल ते देखील अल्कोहोल शिंपडूनच देतो. कारण बिलावरही कोरोनाचे विषाणू असू शकतात. त्यामुळे सर्व गोष्टी सॅनिटायझर केल्याशिवाय घेत आणि देतही नाही. कोरोना विषाणू देवाणघेवाणीतून जास्त पसरतो. त्यामुळे जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.’

कँपोहेरमोसोचे महापौर काय म्हणाले?

‘कोरोनाला आमच्या शहरापासून दूर ठेवण्यासाठी लोकांना समजवणे फार कठीण होते. त्यामुळे आम्ही दिव्याच्या खांबांना स्पीकर्स लावून सातत्याने कोरोनासंदर्भातले संदेश देत होतो. यासाठी आम्ही काउंटीच्या ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना १ हजार रेडिओ वाटले होते. त्यामुळे रेडिओ कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत जनजागृती केली. पोलीस, आरोग्य कर्मचारी अशा सगळ्यांना एकजूट होऊन काम केले,’ असे कँपोहेरमोसोचे महापौर जॅमी रॉड्रिगेझ म्हणाल्या.


हेही वाचा – नांदेडमध्ये कोरोनाचा विस्फोट, कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी लागल्या लांबच लांब रांगा


 

First Published on: March 26, 2021 7:33 PM
Exit mobile version