Flash Back 2020: सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या personalities

Flash Back 2020: सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या personalities

२०२० या वर्षात देशभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले. २०२० हे वर्ष कोरोना महामारीमुळे सर्वांच्या लक्षात राहिले. यासह या वर्षात बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या या सारख्या अनेक दुर्दैवी घटना घडल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, सोशल मीडियावर सर्वाधिक एक्टिव्ह होते. या काळात गुगलचा सर्वात जास्त वापर केला गेला. २०२० या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या top 5 personalities कोणत्या ते जाणून घेऊया….

1.सुशांतसिंह राजपूत

२०२० मध्ये नेटकऱ्यांनी इंटरनेटवर सुशांतसिंह राजपूतला सर्वाधिक सर्च केले. १४ जून २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेतला. यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्याच्याशी निगडीत गोष्टींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

2. रिया चक्रवर्ती 

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सर्वात जास्त सर्च करण्यात आले. दरम्यान, रिया चक्रवर्ती यंदाची ‘मोस्ट सर्च फीमेल सेलिब्रिटी’च्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

3.किम जोंग उन 

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनबाबत यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे चर्चांना उधाण आलं होत. किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी जगभरात जेवढी उत्सुकता होती तेवढी भारतामध्ये देखील होती. त्यामुळे या कालावधीत किम जोंग उन यांना भारतात सर्च करण्यात आले.

4.अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नेहमीच त्यांचे चाहते सर्च करत असतात. यावर्षी ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वात जास्त सर्च करण्यात आले.

5. कंगना रनौत

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना रनौत कायमच चर्चेत असते. समाजात घडलेल्या कोणत्याही घटनेवर ती कायम उघडपणे व्यक्त होते. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत या दोघांत झालेल्या शाब्दिक वॉरमुळे कंगना सर्वाधिक गुगलवर सर्च करण्यात आली

सर्वाधिक सर्च केलेले सेलिब्रिटी २०२० (पुरुष)

सुशांतसिंह राजपूत
अमिताभ बच्चन
अक्षय कुमार
सलमान खान
इरफान खान
ऋषी कपूर
एसपी बालासुब्रमण्यम
सोनू सूद
अनुराग कश्यप
अल्लू अर्जुन

सर्वाधिक सर्च केलेले सेलिब्रिटी २०२० (महिला)

रिया चक्रवर्ती
कंगना रणौत
दीपिका पादुकोण
सनी लिओनी
प्रियांका चोप्रा
कतरीना कैफ
नेहा कक्कर
कनिका कपूर
करीना कपूर खान
सारा अली खान

First Published on: December 29, 2020 4:32 PM
Exit mobile version