लग्नमंडपात वराने केला नागीन डान्स आणि…

लग्नमंडपात वराने केला नागीन डान्स आणि…

हल्ली लग्नसोहळ्यात वर आणि वधूने नृत्यात भाग घेणे किंवा नृत्य सादर करणे विशेष राहिलेले नाही. काही ठिकाणी तर लग्नात वधू-वराने नृत्य सादर करणे ही प्रथाच आहे. अशीच प्रथा उत्तर भारतातील लग्न सोहळ्यांमध्ये दिसते. येथील लग्नसोहळ्यांमध्ये वरातीमध्ये नागीन डान्स करण्याची परंपरा आहे. पण एका वराला नागीन डान्स सादर करणे महाग पडले आहे. वराने सादर केलेला नागीन डान्स न आवडल्याने वधूने भर मंडपात लग्नास नकार दिल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमधील लखीमपुरा खीरी येथे घडला आहे.

अशी घडली घटना

उत्तर प्रदेशमधील लखीमपुरा खीरी येथे एका लग्नसोहळ्यात नवरदेव चक्क दारुच्या नशेत आपल्या मित्रांसोबत वरातीमध्ये नागीन डान्स करत होता. डान्स करण्यात तो एवढा मग्न होता की यावेळी वरमाला गळ्यात घालण्याची वेळ टळून जात असल्याचे त्याला कळलेदेखील नाही. त्यानंतर वधूकडील नातेवाईकांनी वराला डान्स थांबवण्यास सांगितले. पण नवरदेवाने त्यांचे काही एक न ऐकता अरेरावीची भाषा करु लागला. त्यानंतर वर आणि वधू पक्षामध्ये बाचाबाची झाली. पण काही काळाने तणाव शांत होऊन वधू-वराने एकमेकांना वरमाला घातली.

वरमालेनंतर पुन्हा नृत्याला सुरुवात

वरमालेचा विधी पार पडल्यानंतर वराने पुन्हा नागीन डान्स करण्याला सुरुवात केली. वराच्या या वागण्याचा संताप येऊन वधूचा संताप अनावर झाला. आणि तिने लग्नास नकार देत मंडपातून बाहेर गेली. त्यामुळे वर आणि वधू पक्षात भर लग्नमंडपात धिंगाणा सुरु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षाची बाजू समजून घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. या सर्व प्रकारामुळे आणि हुल्लडबाजीमुळे वराला आल्या पावली परत मागे फिरावे लागले.

First Published on: November 11, 2019 11:37 AM
Exit mobile version