जोडप्याने केला व्हॅलेंटाईन ते क्वारंटाईन प्रवास

जोडप्याने केला व्हॅलेंटाईन ते क्वारंटाईन प्रवास

जोडप्याने केला व्हॅलेंटाईन ते क्वारंटाईन प्रवास

सध्या करोनाच्या व्हायरसमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. जगभरात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर एका डॉक्टर जोडप्याचे व्हॅलेंटाईन ते क्वारंटाईन अशी कहाणी चर्चेत आली आहे. या डॉक्टर जोडप्याचे म्हणजेच सिद्धार्थ आणि मोनिका व्हॅलेंटाईन डे दिवशी विवाह बंधनात अडकले. त्यानंतर ते दोघे हनिमूनकरिता युरोपाला गेले होते. त्यांनी कल्पना ही केली नव्हती की, हनिमुनचे १४ दिवस हे युरोप मध्ये सुरू होतील आणि नंतरचे १४ दिवस हे पुण्यातील क्वारंटाईनमध्ये संपले. त्यामुळे यांच्या कहाणीला व्हॅलेंटाईन ते क्वॉंरटाइन असं नावं दिलं आहे.

सिद्धार्थ हा पुण्यात एमसीएच युरोलॉजीचा अभ्यास करत आहे. तो याबाबत म्हणाला की, ‘आम्ही दोघे हनिमूनसाठी फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड्सला गेलो होतो. जेव्हा आम्ही युरोपातून परतलो आणि त्यानंतर पुण्याला आलो तेव्हा मला करोनाची लक्षणे दिसून आली आणि त्यानंतर मला क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे मी क्वारंटाईनध्ये दाखल झालो.’

जेव्हा ५ मार्चला सिद्धार्थ मुंबईला परतला तेव्हा विमानतळावर त्यांची तपासणी केली. त्यानंतर तो पाच दिवसांनी जिथे काम करतो म्हणजेच पुण्यात गेला. त्यावेळेस त्याला सर्दी झाली. त्यानंतर त्याला पुण्यातील रुग्णालयांतील वरिष्ठ डॉक्टरांनी सेल्फ-क्वारंटाईन करण्याचा सल्ला दिला.

बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी आणि समाजाच्यासाठी लक्षात ठेवाव्या लागतात. आपण दिवसभरात काय करतो याची योजना तयार करणे. तसंच तुमच्या घर स्वच्छ आहे की याची खात्री करू घ्या.

सिद्धार्थची पत्नी मोनिका ही गोव्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करते तसंच तिचे पालक भागलपूर मधील हॉस्पिटलमध्ये काम करतात. सिद्धार्थ घाबरला नाही आणि त्याची वेळ करोनाशी दोन हात करण्याची होती, हे त्याला समजले आहे. त्यामुळे तो हनिमूनचे फोटो पाहून स्वतःला गुंतून ठेवले आणि इतरांनाही तो सल्ला देत आहे.

जेव्हा आम्हाला कळाले की त्याला क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सल्ला दिला आहे. त्यावेळेस त्याला आम्ही हे तात्काळ करायला सांगितलं. आताच्या परिस्थितीत जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे. क्वॉरंटाइन करण्यापासून पळून जाण्यासारखे नसून ही भीतीदायक गोष्ट आहे, असं सिद्धार्थचे वडील डॉक्टर संजय सिंह म्हणाले. आता सिद्धार्थ ठीक झाला असून तो आता पुन्हा कामावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे.


हेही वाचा – मासिकासाठी लेडी गागाने केले न्यूड फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!


 

First Published on: March 19, 2020 4:35 PM
Exit mobile version