Valentines Week2022 Horoscope: यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला ‘या’ राशीच्या लोकांवर होणार प्रेमाचा वर्षाव

Valentines Week2022 Horoscope: यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला ‘या’ राशीच्या लोकांवर होणार प्रेमाचा वर्षाव

Valentines Week2022: यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे' ला 'या' राशीच्या लोकांवर होणार प्रेमाचा वर्षाव

Valentines Week2022 Horoscope: आजपासून  व्हॅलेंटाईन विकला सुरुवात झाली आहे. प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेंटाईन डे फार खास असतो. प्रेमाचा हा विक एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस असतो. आज रोझ डे ने व्हॅलेंटाईन विकला सुरुवात झाली. रोझ डे नंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी व्हॅलेंटाईन डे ने  व्हॅलेंटाईन विकची सांगता होते.  नवीन नाती जोडण्यासाठी, जुनी नाते नव्याने विणण्यासाठी व्हॅलेंटाईन विक फार स्पेशल मानला जातो. प्रेमाच्या या व्हॅलेंटाईन विकमध्ये कोणत्या राशीच्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव होणारा? तर कोणाच्या पदरात निराशा पडणार? हे जाणून घ्या. ज्योतिष शास्त्रानुसार, व्हॅलेंटाईन विकमध्ये तुमच्या प्रेमाची आणि नातेसंबंधाची कुंडली कशी असणार हे देखील पाहा.

मेष – मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या प्रियकराशी किंवा नवऱ्याशी संवाद साधा. त्यांच्याजवळ आपल्या मनातील भावना व्यक्त करा. तुम्ही जर एकमेकांशी बोलला नाहीत तर तुमचे नाते बिघडू शकते.

वृषभ – या राशीच्या लोकांना आपला प्रियकर किंवा प्रेयसी शोधण्यासाठी हा विक फार लकी ठरणार आहे. तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे या विकच्या शेवटी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ठरवले जाईल. तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा. कौटुंबिक वादामुळे तुमचे मन निराश होऊ शकते.

मिथुन – सावधान राहा. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे भांडण होऊ शकते. भांडणामुळे तुमचे जास्त नुकसान होणार नाही परंतु भांडण होणार नाही याकडे लक्ष द्या. व्हॅलेंटाईन विकच्या मध्यात तुमच्यात असलेले जुने वाद मिटतील आणि संबंध अधिक दृढ होतील. प्रेमाबाबत तुम्हाला चांगली बातमी देखील मिळेल.

कर्क – कर्क राशीच्या लोकांचा प्रेमविवाहाचा योग तयार होत आहे. त्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगून मोकळे व्हा. तर लग्न झालेल्यांचे प्रेम पुन्हा एकदा नव्याने फुलेल. आयुष्यात काही अडचणी आल्या तर जोडीदाराची साथ मिळेल.

सिंह – तुमचा जोडीदार किंवा नवरा तुम्हाला समजून घेत नसेल किंवा तुमच्याशी योग्य वागत नसेल तर त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला. याने तुमचे नाते सुधारेल. व्हॅलेंटाईन विकमध्ये काही अनोळखी लोक आयुष्यात येऊ तुमचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकतात.

कन्या – कन्या राशीत जे लोक अविवाहीत असतील त्यांच्या लग्नाचा योग या विकमध्ये होण्याची शक्यता आहे. तुमच्यातील प्रेम आणखी वाढेल. वैवाहिक आयुष्यात काही तणाव असतील तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचे नाते तुटू शकते.

तूळ – सावध राहा. तुम्ही जर कोणावर प्रेम करत असाल तर त्यांना तुमच्या मनातील गोष्ट सांगू नका. असे केल्यास तुमच्या पदरी निराशा पडू शकते. विवाहीत असाल तर या विक चांगल्या ठिकाणी प्रवासाचे प्लानिंग करा.

वृश्चिक – तुम्हाला नवा जोडीदार मिळू शकतो. प्रेमाच्या नव्या गाठी बांधल्या जाऊ शकतात. काही जुने वाद असतील तर ते मिटतील. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

धनु – शेजारी किंवा जवळच्या नातेसंबंधात तेढ निर्माण होऊ शकतो. विनोद केला तर तो विचारपूर्वक करावा. तुमच्या मनातील गोष्ट तुमच्या जोडीदाराला मनमोकळेपणाने बोलून दाखवा.

मकर – तुमच्या व्यस्त वेळातून जोडीदाराला आवर्जुन वेळ द्या. असे न केल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. विकेंडला पिकनिकचा प्लान करा. बाहेर फिरायला गेल्याने तुमच्यातील संबंध सुधारतील.

कुंभ – या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन विक फार चांगला आणि मजेशीर असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकतात. तर काहींच्या नात्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा.

मीन – तुमच्यातील जोडीदाराचे आरोग्य सुधारेल आणि प्रेमसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे जुन्या समस्या संपतील. तुमच्या भावनांवर आवर घाला. भावनिक बोलू नका जेणेकरुन तुम्हाला पश्चापात करण्याची वेळ येईल.


हेही वाचा – ‘या’ राशीवाल्यांसाठी येणारे ११ दिवस फलदायी, होणार सूर्यदेवाची कृपा

First Published on: February 7, 2022 10:07 PM
Exit mobile version