Video : कॅन्सरवर मात करणाऱ्या लेकाच पित्याने नाचून केलं जंग्गी स्वागत..

Video : कॅन्सरवर मात करणाऱ्या लेकाच पित्याने नाचून केलं जंग्गी स्वागत..

Video : कॅन्सरवर मात करणाऱ्या लेकाच पित्याने नाचून केलं जंग्गी स्वागत..

आपल्या मुलाला निरोगी आणि आनंदी पाहणं याशिवाय वडीलांसाठी दुसरी आनंदाची गोष्ट कोणती असू शकते. वडील आणि मुलाच्या या आगळ्यावेगळ्या नात्यातील दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक वडील आपल्या मुलाला कुशीत घेऊन हात उचलून नाचत आपला आनंद व्यक्त करत आहे. या नाचण्या आणि आनंदामागे कारणंही तसंच सांगितले जातेय. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मात करुन आपलं मुलं सुखरुप घरी परतल्याने वडीलांकडून असं जंग्गी स्वागत केलं जातयं. वडील आणि मुलाचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ अनेक युजर्सना देखील खूप आवडला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये वडील- मुलाची जोडी दिसतेय. वडीलांना जेव्हा कळते की, त्यांचा मुलगा कर्करोगातून मुक्त झाला तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. यावेळी आनंदाने वडीलांनी मुलाचा हात हातात घेत चक्क नाचायला सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वडील आपल्या मुलाला कुशीत घेऊन एका गाण्यावर नाचत आहेत. जेव्हा मुलगा वडीलांच्या कुशीतून खाली उतरतो तेव्हा तोही गाण्यावर ठेका धरु लागतो. यात दोघांनी एकाच रंगाची जीन्स, शर्ट परिधान केल्याचे दिसतेय.

हा व्हिडिओ केनिथ एलन थॉमस( Kennith Allen Thomas) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला होता, जो आता तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्य़ंत जवळपास २ लाख वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना देखील ही बाप-लेकाची जोडी जामचं आवडलेली दिसतेय.

या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले की, “महान नेत्यांना आत्मविश्वास कसा निर्माण करायचा हे माहित आहे, की ज्यामुळे तुम्ही यशाच्या मार्गापर्यंत पोहचू शकता.” या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. ब्रॅंडन मॅक्गी जूनियरने लिहिले की, “धन्यवाद येशू”. तर दुसऱ्या एक युजर्सने लिहिले की- देवाचे आशीर्वाद असू देत.


 

First Published on: October 19, 2021 11:25 AM
Exit mobile version