सत्यनारायणाची कथा इंग्रजीमध्ये सांगणाऱ्या गुरूजींचा व्हिडीओ व्हायरल

सत्यनारायणाची कथा इंग्रजीमध्ये सांगणाऱ्या गुरूजींचा व्हिडीओ व्हायरल

हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये अनेकदा सत्यनारायणाच्या कथेचं पठण केलं जातं. अनेकदा हिंदू किंवा संस्कृत भाषा वगळता अनेकजण आपल्या बोली भाषेत कधेचं पठण करत असल्याचं आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे. परंतु आता सत्यनारायणाच्या कथेचं चक्क इंग्रजीमध्ये देखील पठण होत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका घरामध्ये सत्यनाराणाची पूजा मांडलेली दिसत आहे. समोर घरातील सदस्य बसलेले दिसत आहेत. यावेळी तिथे पूजा करण्यासाठी आलेला पंडित घरातील सदस्यांना सत्यनारायणाची कथा सांगत आहे. मात्र, तो ही कथा हिंदी किंवा संस्कृत भाषेमध्ये न सांगता, ती इंग्रजी भाषेमध्ये सांगत आहे. तर समोर बसलेले कुटुंबातील सदस्य ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकत आहेत.

या व्हिडीओवर एका युजने लिहिलंय की, चला “हिंदू धर्माचं ज्ञान आता इंग्रजीमध्ये सुद्धा मिळणार आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “भारत विकास करत आहे.” तर काहींच्या मते, “नव्या पिठीसाठी हे समजायला सोप्प आहे.”


हेही वाचा :Video : डोमिनोज पिझ्झाच्या पीठावर ठेवलेय टॉयलेटचे ब्रश; फोटो व्हायरल होताच युजर्सचा संताप

First Published on: August 16, 2022 5:22 PM
Exit mobile version