शाहिद आफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ TikTok वर व्हायरल

शाहिद आफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ TikTok वर व्हायरल

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच त्याने कश्मीरविषयी विधान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. ज्यामुळे भारतात त्याच्याविरोधात संताप वाढला. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही आफ्रिदीवर टीका केली. शाहिद आफ्रिदीचाआता टिकटॉकवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो तंबाखू खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांचा आहे, परंतु भारतीयांनी पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

व्हिडीओमध्ये आपल्याला दिसेल की, आफ्रिदी हळूच तोंडात तंबाखू टाकत आहे. टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट करत वापरकर्त्याने लिहिलं की, “आज त्यांचे पंतप्रधान भारताविरूद्ध बोलले आहे…” हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@krishusinha3

##pakistani ##pok ##india ##viral ##NavratnaCoolChampi ##trending ##foryou ##foryoupage ##tiktok

♬ original sound – krishusinha3


हेही वाचा – पुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिदायतुल्लाह मलिक या दहशतवाद्याची


हा व्हिडिओ २०१८ चा आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह अनेक उल्लेखनीय प्रतिनिधीमंडळांच्या उपस्थितीत देशाच्या संरक्षण दिन समारंभात तंबाखू खाताना दिसला होता. संरक्षण दिन ६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. रावलपिंडीतील जनरल मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तिथे आफ्रिदी देखील पाहुण्यांमध्ये उपस्थित होता. कॅमेरा त्याच्या बाजूला होता, आफ्रिदीने हळू हळू तंबाखू बाहेर काढला आणि तोंडात टाकला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने तंबाखू खात नव्हतो तर बडीशेप खात होतो, असं स्पष्टीकरण दिलं.

 

First Published on: May 29, 2020 9:08 PM
Exit mobile version