Video : ‘माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड’ पाहताच, बायकोने भररस्त्यात केला हंगामा

Video : ‘माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड’ पाहताच, बायकोने भररस्त्यात केला हंगामा

Video : 'माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड' पाहताच, बायकोने भर रस्त्यात केला हंगामा

आपल्या नवऱ्याची गर्लफ्रेंड दिसताच एखादी पत्नी भररस्त्यात पतीला मारहाण करते, अशा घटना आपण आजपर्यंत मालिकांमधून पाहत आलो आहोत. मात्र, अशीच एक सत्य घटना चक्क मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भररस्त्यात वाहतूक पोलिसांसमोर हंगामा केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नेमके काय घडले?

हाजी अलीपासून काही मीटर अंतरावरील पेडर रोडजवळील पेट्रोल पंप परिसरात हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भररस्त्यात ट्रॅफिकमध्ये हंगामा केल्याचे पाहायला मिळाले.

काय आहे हा व्हिडीओ?

या व्हिडीओत महिला आपल्या पतीच्या गाडीच्या काचा खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच गाडीवर चढून काचेवर जोडे मारताना दिसत आहे. तसेच या महिलेचा राग अनवार झाल्याने तिने चक्क आपल्या पतीला गाडीबाहेर खेचून मारहाण केली आहे.

या सर्व घटनेनंतर गावदेवी पोलिसांनी त्या महिलेची विचारपूसही केली. मात्र, तिने पतीविरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही. परंतु, वाहतूक पोलिसांनी दोन्ही गाड्यांवर कारवाई केली आहे. यातील पांढऱ्या रंगाच्या गाडीवर शनिवारी कारवाई करण्यात आली असून मोटर वाहतूक अधिनियम १२२ अन्वये ई-चलन पाठवण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.


हेही वाचा – वीज बिलाचा धनादेश बाऊंस झाल्यास होणार ‘इतका’ दंड


First Published on: July 13, 2020 7:49 PM
Exit mobile version