Video : आतून जळणारं झाड पाहिलंत का कधी?

Video : आतून जळणारं झाड पाहिलंत का कधी?

पावसाळ्यामध्ये वीज कोसळण्याच्या अनेक घटना घडताना आपण पाहिल्या असतील. अशा प्रकारे वीज कोसळल्यानंतर संपूर्ण झाडच उद्ध्वस्त होतं. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये झाडाचं संपूर्ण खोडच आतून जळत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर नेटिझन्सच्या जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही वेळातच या व्हिडिओला ७४ लाख व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ कोणत्या भागातला आहे, याविषयी अद्याप पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सो फेन नावाच्या एका ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्वीट झाला आहे. खोडाच्या आतल्या भागातल्या ज्वाळा या व्हिडिओमध्ये अगदी सहज दिसून येत आहेत.

३ दिवसांत ३ लाख ६० हजार लाईक्स!

२० ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून गेल्या ३ दिवसांमध्ये या व्हिडिओला तब्बल ७४ लाखांहून जास्त व्यूज मिळाले आहेत. शिवाय ३ लाख ६० हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे, तर ९३ हजार नेटिझन्सनी तो रिट्वीट केला आहे.

या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत. काहींना तो बनावट वाटत आहे, तर अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसल्याचं सांगितलं आहे. काहींनी तर अशाच स्वरुपाचे दुसरे काही व्हिडिओ ट्वीट केले आहेत. काही नेटिझन्स ही आग नक्की कशी लागली असावी? हा व्हिडिओ खरा हे की बनवलेला आहे? वीजेमुळे नसेल, तर खोडाच्या आत झालेल्या काही प्रक्रियांमुळे ही आग लागली असावी का? अशा शंका व्यक्त करत आहेत. त्याची वैज्ञानिक कारणं देखील काही जण देत आहे. त्यामुळे आता ही आग नक्की कशामुळे लागली? हे एक नवंच कोडं तयार झालं आहे.

First Published on: October 23, 2019 2:00 PM
Exit mobile version