video: वाघिणीने तीन बछड्यांसह नदी किनारी लुटला पाणी पिण्याचा आनंद

इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुशांत नंदा यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा शेअर केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांना खूपच आवडला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल केला जात आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये वाघीण तिच्या बछड्यांसह नदी किनाऱ्यावर पाणी पितांना दिसत आहे. या पेंच टायगर रिजर्वची वाघांच्या व्हिडिओची नोंद देखील करण्यात आली आहे. या पेंच टायगर रिजर्वमध्ये रॉयल बंगालची वाघीण ‘कॉलरवाली’ने जानेवारी महिन्यात चार बछड्यांना जन्म दिला होता.

व्हिडिओमध्ये वाघीण आपल्या तीन पिल्लांना घेऊन नदी किनारी पाणी पिण्याचा आनंद घेताना दिसतेय. इंडियन फॉरेस्ट सर्विस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत बंगालची वाघीण ‘कॉलरवाली’ बद्दल अधिक माहिती देखील दिली आहे. ही वाघीण काही न खाता-पिता दोन आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकते. मात्र पाण्याशिवाय जास्तीत जास्त चार दिवसांपर्यंत राहू शकते, असे सुशांत यांनी सांगितले.

बघा हा सुंदर व्हिडिओ

हा व्हिडिओ ७ नोव्हेंबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ८ हजाराहून अधिक व्ह्यूज झाले आहेत. तर १ हजारापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

अशा आल्यात या व्हिडिओवर प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल इंडियन टायगर लँडस्केप महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात आढळतात. कॉलरवाली टायगर रिजर्व हा सगळ्यात प्रसिद्ध वाघीण आहे. याची वर्ल्ड रेकॉर्ड केल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील १३ वर्षात या वाघिणीने २९ बछड्यांना जन्म दिला आहे.


…आणि बघितले तर दिसली लांब-लचक मगर
First Published on: November 8, 2019 3:49 PM
Exit mobile version