viral video:बाहुबलीतील कठीण गाणं गात तरुणाने केलं मंत्रमुग्ध..

viral video:बाहुबलीतील कठीण गाणं गात तरुणाने केलं मंत्रमुग्ध..

आजच्या युगात सोशल मीडिया जगातील सर्वात जलद संप्रेषणाचे साधन बनले आहे. एखादा व्हिडिओ किंवा फोटो या सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध व्हायला जराही कालावधी लागत नाही. जलद गतीने एखादा व्हिडिओ सर्वप्रेक्षकांपर्यंत पोहोचला जातो. या सोशल मीडियाद्वारे जलदगतीने आपले टॅलेंट जगापर्यंत पोहचू शकते. तसेच अल्पवधीतच एखाद्याला लोकप्रियताही मिळू शकते. अशाच प्रकारचा एका सामान्य मुलाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटातील जय जयकारा…. हे गाणं या मुलाने गायले आहे. त्याचा मंत्रमुग्धकरणारा आवाज ऐकून सगळेच त्याच्या आवाजाचे दिवाने झाले आहेत. हा व्हिडिओ 9 मे रोजी फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत 9.6 दशलक्ष लोकांनी हा व्हिडि पाहिला आहे. तसेच 10 लाखाहून अधिक लाईक्स आणि 26 हजार कमेंट्स मिळाल्या आहेत. या मुलाचा आवाज प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीसही पडला आहे.

व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की मुलगा आपल्या मित्रासह रस्त्यावर उभा आहे आणि कॅमेरामध्ये गाणे गात आहे. त्याचा आवाज ऐकून लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. लोक हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आधी मला वाटले की ते लिपसिंक करत आहे, परंतु हा त्यांचाच आवाज आहे. खरच हा आवाज ऐकून अंगावर शहारे आले आहेत’ तर दुसरा यूजर्स म्हणाला की, ‘याने मनापासून हे गाणं गायले आहे. एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये हा आला पाहिजे, ज्यामुळे त्याला आत्मविश्वास आणि प्रसिद्धीदेखील मिळेल’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओला आल्या आहेत.


हे वाचा- आनंद महिंद्रांचे सोशल डिस्टेंसिंगवर गमतीशीर ट्वीट, तुम्हीही पाहून हसाल

First Published on: May 12, 2021 7:47 PM
Exit mobile version