मुंबई पोलीस म्हणाले, ‘५ वर्षांपूर्वी झाली होती आपली भेट’

मुंबई पोलीस म्हणाले, ‘५ वर्षांपूर्वी झाली होती आपली भेट’

सोशल मीडियातील ट्विटरवर सर्वाधिक कोण अॅक्टिव्ह असेल तर ते म्हणजे मुंबई पोलीस. मुंबई पोलीस नेमही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच चर्चा होत असते. तर मुंबई पोलीस सोशल मीडियाद्वारे नेहमीच मुंबईकरांसह नागरिकांची जनजागृती करत असतात. दरम्यान, डिजिटलायझेनच्या युगात जुळवून घेताना, सोशल मीडियाचा मुंबई पोलिसांनी पुरेपूर वापर केला. या सकारात्मक वापराला ५ वर्ष पूर्ण झाली असून मुंबईकरांना ही माहिती देण्यासाठी देखील मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलचाच वापर केला.

असे म्हणाले मुंबई पोलीस…

‘५ वर्षांपूर्वी आपली भेट ट्विटरवर झाली होती. या ५ वर्षांत आम्ही तुमच्या अधिक जवळ येऊ शकलो!’, असे म्हणत मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ५ वर्षापूर्वीच्या भेटीची आठवण करून दिली आहे.

हे ट्विट करत मुंबई पोलिसांनी त्यांना आवडलेले काही ट्विट शेअर केले आहेत. यासह मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना यामध्ये सहभागी करून घेताना त्यांना आवडलेले ट्विट शेअर करण्याचे आवाहन देखील केले आहे. #MyFavMPTweet या हॅशटॅगचा वापर करून मुंबईकरांना त्यांच्या आवडीचे ट्विट शेअर करता येणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असताना लॉकडाऊनच्या काळातही मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून असे अनेक ट्वीट केले होते. या ट्विटच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्यासाठी कित्येक अनोख्या शक्कलही लढविल्या. इतकंच नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड आणि मिम्स ट्रेंडिंगच्या माध्यमातूनही मुंबई पोलीसांनी सामान्य लोकांना जागरूकही केलं. कोरोना दरम्यान मुंबई पोलिसांचे ट्वीटही जोरदार व्हायरल झाल्याचे दिसले.


Boxing Day Test: भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘अजिंक्य’ विजय; मालिकेत बरोबरी

First Published on: December 29, 2020 2:36 PM
Exit mobile version