#WeAre420; आमदारांच्या आकड्यांवरून मजेदार ट्विट ट्रोल

#WeAre420; आमदारांच्या आकड्यांवरून मजेदार ट्विट ट्रोल

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे. आज याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असून सगळ्यांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. मात्र आज सोशल मीडियावर राज्यातील राजकारणाबद्दल वेगळीच चर्चा सुरू आहे. एका बाजूला बघायला गेले राज्यातील सत्तापेचाबद्दल नेटकरी संताप व्यक्त करत आहेत तर दुसऱ्या बाजूला खिल्ली उडवली जात आहे. सोमवारी रात्री महाविकासआघाडीने ‘आम्ही १६२’ (we are 162) या ब्रीदवाक्याखाली मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये सर्व आमदारांच्या उपस्थित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान ट्विटरवर #WeAre162 असं हॅशटॅग ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर आज ट्विटरवर #WeAre420 हे हॅशटॅस तुफान ट्रेंड होत आहे. या ट्रेंडिग ट्विटरमध्ये मजेदार ट्विट नेटकरी शेअर करत आहे. त्यातील मजेदार ट्विट तुम्ही देखील पाहा.

सोमवारी देखील देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ट्विटवर #ResignDevendraFraudnavis असं हॅशटॅस ट्रेंड होतं होत. या हॅशटॅगचा वापर करून नेटकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असं म्हणतं संताप व्यक्त केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा – ‘#ResignDevendraFraudnavis’: मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नेटकरी संतापले


 

First Published on: November 26, 2019 10:13 AM
Exit mobile version