टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी ‘या’ महिलेला मिळायचा दीड लाख रुपये पगार

टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी ‘या’ महिलेला मिळायचा दीड लाख रुपये पगार

टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी 'या' महिलेला मिळायचा दीड लाख रुपये पगार

एका महिलेला टेक्स मेसेज पाठवण्याचे जवळपास दीड लाख रुपये पगार मिळायचा. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असले ना. पण खुद्द त्या महिलेनेच टिकटॉकवर एक व्हिडीओ अपलोड करुन याबाबत खुलासा केला आहे. या महिलेला एका व्यक्तीकडून टेक्स मेसेज पाठवण्यासाठी दीड लाख रुपये पगार दिला जायचा. मात्र हा व्यक्ती टेक्स मेसेजसाठी इतके पैसे का देत होता याबाबतचा खुलासाही तिने या व्हिडीओत केला आहे. या महिलेचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत 7.7 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

बेली हंटर असे या महिलेचे नाव असून ती अमेरिकेची रहिवासी आहे. बेलीने तिच्या @xbaileyhunter या Tiktok अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून त्या व्यक्तीने तिला दिलेल्या पगाराची आणि व्यवहारांची माहिती दिली आहे.

या व्हिडिओमध्ये बेली हंटरने सांगितले की, ती अमेरिकेतील Buffalo Wild Wings या रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करत असताना त्या व्यक्तीशी तिची ओळख झाली. हा व्यक्ती त्यावेळी एका अल्पवयीन महिलेसोबत जेवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आला होता. बेली त्याला शुगर डॅडी असे म्हणायची.

बिलाऐवजी टीपमध्ये दिली मोठी रक्कम!

वेट्रेस बेलीने त्या व्यक्तीला आणि त्याच्या पार्टनरला रात्रीचे जेवण सर्व केले. मात्र 2,900 रुपयांच्या बिलाऐवजी त्या व्यक्तीने तिला 7,400 रुपयांची टीप दिली. यासोबतच त्याने आपले कार्डही वेट्रेसला दिले. जेव्हा बेलीने कार्डवरील नंबरवर आभार मानण्यासाठी त्या व्यक्तीला मेसेज पाठवला, तेव्हा त्या व्यक्तीने त्यावर रिप्लाय केला की, ‘तुम्ही आश्चर्यकारक आहात, तुम्ही टीपसाठी पात्र आहात, तुम्ही मला यापुढे पुढे डिनर कधी सर्व करणार आहात? तेव्हा मी येईन.’

मेसेजच्या माध्यमातून वाढली ओळख

आणखी काही पैसे कमावण्याच्या आशेने बेलीने त्या व्यक्तीला सांगितले की, पुढच्या वेळीही मीच वेट्रेस म्हणून इथे काम करताना दिसेल. यामुळे बेला आणि त्याच्यातील मैत्री वाढत गेली. यावर बेलीने सांगते की, त्या व्यक्तीने मला मेसेजवर आपण मेसेजवर केवळ प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण भावनेने बोलू. म्हणजेच फक्त प्रेमळ गोष्टी. यानंतर दोघेही एका मेसेजिंग अॅपवर बोलू लागले. बेलीच्या म्हणण्यानुसार, तो माणूस खूप हळूवार आणि अनौपचारिकपणे बोलत असे. तो मला फक्त मेसेज आणि बोलण्यासाठी पैसे द्यायचा.बेलीने त्याला तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले, तेव्हा त्या व्यक्तीने तिला मदत करण्याची तयारी दर्शवली. हे ऐकून बेलीचा विश्वासच बसला नाही.

बेली हंटरच्या म्हणण्यानुसार, तो व्यक्ती तिला न मागता पैसे पाठवत असे. असे तीन वर्षे चालले. बेलीने त्याच्या पैशाने भरपूर शॉपिंग केली. त्या व्यक्तीने बेलीला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या. हे सर्व बेलीने इंडियाना प्रांत सोडण्यापूर्वी 3 वर्षे चालू राहिले. तोपर्यंत, दर महिन्याला ती व्यक्ती बेलीला मोठी रक्कम देत राहिला, तीही केवळ मेसेजच्या बदल्यात. असे ती सांगते. बेलीने त्यानंतर आणखी एक समान व्यक्ती शोधली परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीही भेटली नाही.


 

First Published on: January 22, 2022 2:11 PM
Exit mobile version